MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम केवळ कौशल्यावर आधारित नोकऱ्यांनुसार तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक आहे कॉम्प्युटर मधील एक्सेल कोर्स.

पॉवर पॉईंट (Power Point) प्रेझेंटेशन आणि एम एस वर्ड (MS Word) ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल (MS Excel) शीट्सपर्यंत, काही कौशल्ये आहेत जी नेहमी नोकरीच्या बाजारपेठेत आवश्यक असतात. जर कोणाकडे (MS Excel Free Online Course) व्यावसायिक पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्र यासह एक्सेल शीटवर काम करण्याचे कौशल्य असेल, तर हे स्किल तुम्हाला नोकरी मिळवण्यास मदत करू शकते. यामुळे उमेदवाराचा Resume प्रभावी होवू शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की MS Excel हा कोर्स तुम्ही मोफतपणे कुठे शिकू शकता याविषयी…

1. मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
मायक्रोसॉफ्ट त्यांच्या वेबसाइटवरच एमएस एक्सेलवर काम करण्याचे प्रशिक्षण देते. कंपनीने आपल्या वेबसाइटवर व्हिडिओ ट्यूटोरियल अपलोड केले आहेत. हे पाहून एक्सेल शीटवर काम करण्याचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करता येते.

2. उडेमी (Udemy) (MS Excel Free Online Course)
Udemy ही एज्युटेक कंपनी आहे. हे त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विनामूल्य अनेक अभ्यासक्रम देतात. या प्लॅटफॉर्मवर एक्सेल शीट्सशी संबंधित अनेक कोर्सेस करता येतात. ज्यामध्ये मूलभूत ते प्रगत स्तरापर्यंतच्या लहान अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

3. लिंक्डइन (LinkedIn)
व्यवसाय आणि रोजगार केंद्रित सोशल मीडिया (MS Excel Free Online Course) प्लॅटफॉर्म LinkedIn वर देखील काही कोर्स करता येतात. या प्लॅटफॉर्मवर एक्सेलच्या टिप्ससह अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

4. कोर्सेरा (Coursera)
कोर्सेरा या ऑनलाइन ट्यूटोरियल प्लॅटफॉर्मवर शेकडो विनामूल्य ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यापैकी एक आहे एक्सेल कोर्स. एक्सेल शीटशी संबंधित अनेक (MS Excel Free Online Course) कोर्सेस आहेत. ज्यामध्ये परिचयापासून ते प्रगत स्तरापर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या ऑनलाइन कोर्सेसमध्ये डेटा ॲनालिसिस, डेटा मॅनेजमेंट इत्यादी गोष्टी एक्सेल शीटवर शिकता येतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com