करिअरनामा ऑनलाईन । IBPS आणि MPSC या दोन परीक्षा (MPSC Update) एकाच दिवशी आल्यानं MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला अखेर यश आलं असून MPSCची २५ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. IBPS आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार होत्या; त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पैकी एक परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठं आंदोलन छेडलं होतं.
MPSC ने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २५ ऑगस्टला आयोजित केली होती. या परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. IBPS आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी अशी (MPSC Update) मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत होते. चार दिवसांवर परीक्षा असताना अभ्यास सोडून विद्यार्थी पावसात आंदोलनाला बसले होते. अखेर आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आय़ोगाची बुधवारी बैठक होणार होती, पण ती गुरुवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. दरम्यान (MPSC Update) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही लाक्षणिक उपोषणही केलं. तर रोहित पवार यांच्यानंतर आता थेट शरद पवार यांनी सरकारला इशारा देत आंदोलन करणार असं म्हटलं होतं.
शरद पवार आंदोलनात सहभाग घेण्यापूर्वीच घेतला निर्णय (MPSC Update)
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यांनी ट्विट करत म्हंटल होते कि, “पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परिस्थिती चिघळत असताना सत्ताधारी या प्रकरणाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार;” असं ट्विट शरद पवार यांनी केलं होते. मात्र शरद पवार या आंदोलनात उतरण्यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com