MPSC Students : ‘या’ मागण्यांसाठी MPSC चे विद्यार्थी आक्रमक; आयोगाविरोधात पुण्यात छेडलं आंदोलन

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची तयारी (MPSC Students) राज्यातील लाखो तरुण करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरीसाठी आणि MPSC परीक्षा पास करण्यासाठी हे विद्यार्थी घालवत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. तसंच गेल्यावर्षी पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपासून MPSC बद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मात्र आता पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया.

काही दिवसांपूर्वी MPSC नं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि सिलॅबसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये MPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. मात्र यावर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी (MPSC Students) आक्रमक झाले आहेत. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

तसंच गेल्या कित्येक वर्षांपासून MPSC च्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत आहे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत म्हणूनच (MPSC Students) अशा प्रकारांवर MPSC नं लक्ष द्यावं अशीही मागणी विद्यार्थी करत आहेत.

तसंच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट MPSC नं केलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. MPSC विद्यार्थ्यांचं म्हणणं आयोग ऐकून घेत नाही; अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com