MPSC Results 2020 : दिर्घ प्रतिक्षेनंतर PSI परीक्षेचा निकाल जाहीर; संभाजीनगरचा सुनील खाचकड राज्यात अव्वल

करिअरनामा ऑनलाईन । MPSCकडून 2020 मध्ये घेण्यात (MPSC Results 2020) आलेल्या PSI पदाच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये संभाजीनगरचा तरुण सुनील खाचकड हा राज्यातून पहिला आला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर निकाल जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट मुख्य परीक्षा-2020 पोलीस उप निरीक्षक पद तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Results 2020) करण्यात आली आहे. या यादीत 427 गुण मिळवून सुनील खाचकड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर निर्मलकुमार भोसले याने 425.50 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर गणेश जाधव याने 425 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून सातत्याने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर आयोगाकडून या परीक्षेचा निकाल जाहीर (MPSC Results 2020) करण्यात आला आहे. आयोगाकडून 5 जणांची निवड यादी जाहीर केली आहे. तर गुणवत्ता यादीत 1 हजार 782 जणांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com