MPSC Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी MPSC ने जाहीर केली 823 पदांवर भरती!! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । MPSC ची परीक्षा देवून सरकारी नोकरी (MPSC Recruitment 2023) मिळवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक  आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 पदाच्या एकूण 823 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Comission)
भरले जाणारे पद – महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022
1. दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) – 78 पदे
2. राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 93 पदे
3. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 49 पदे
4. पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 603 पदे
पद संख्या – 823 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
1. अराखीव (खुला) – रु. 719/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

पात्र प्रवर्ग  आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 सर्वाधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता

पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र रमापा उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

अंतर्वासित (Internship) किया कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे.


मिळणारे वेतन –

प्रवर्ग मिळणारे वेतन
महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 एस.१४. रुपये ३८६०० १२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. दिलेल्या मुदतीनंतर आलेले (MPSC Recruitment 2023) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज भरताना संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.

असं असेल परीक्षेचे स्वरुप –
1. परीक्षेचे टप्पे :- एक – लेखी परीक्षा
2. परीक्षेचे स्वरुप :- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
3. प्रश्नपत्रिका :- दोन
4. एकूण गुण :- २००
लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.

काही महत्वाच्या तारखा – (MPSC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्टपासून सुरु) – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com