MPSC लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर, सांगलीचा विजय लाड राज्यात पहिला

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेतील लिपिक – टंकलेखन परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात सांगलीचा विजय लाड यांनी राज्यात आणि मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर अमरावतीच्या प्राजक्ता चौधरी महिलांमधून प्रथम आल्या आहेत.

आयोगाने गेल्या वर्षी 6 आणि 10 ऑक्टोबर 2019 मध्ये  लिपिक – टंकलेखन (मराठी आणि इंग्रजी ) या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत एकुण 179 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त आणि गुणवत्ताधारक खेळाडूंनी दावा केला होता.त्यामुळे निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. त्यासंदर्भात परीक्षेसाठी संबंधीत अर्जात उमेदवारांनी केलेले दावे  विचारात घेऊन निकाल जाहीर करण्यात आला .

हे पण वाचा -
1 of 36

उमेदवारांना या परीक्षेची उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे ,त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठ्वल्याच्या दिनांकापासून 10 दिवसात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com