Motivational Story : आईने बांगड्या विकून घर चालवले; मुलाने अधिकारी होऊन नाव कमावले; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । “आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली (Motivational Story) आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल,” असं दानिश सांगतो. झारखंड लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत दानिश हुसैनने चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत संपूर्ण झारखंडमधून त्याने 80 वा क्रमांक मिळवला आहे. वाचूया त्याच्या प्रेरणा देणाऱ्या प्रवासाविषयी…

मनात जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर कितीही कठीण परिस्थिती आली तरी माणूस मागे हटत नाही. अशीच काहीशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुण तरुणींबद्दल आपण ऐकलं असेलच. आर्थिक अडचणींवर मात करत दानिश हुसैनने झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 80 वा क्रमांक मिळवला आहे.

आईला वाटायचं मुलांनी शिकावं 

दानिश हा झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील जाहुदी अन्सारी यांच्या निधनानंतर दानिशची आई झरिना खातून बांगड्या विकून घर चालवते. परंतु, मुलांनी शिकावं, असं त्यांना वाटायचं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी मुलांना शिक्षण दिलं. झरीना यांनी मुलांना शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं.

मुलांच्या संगोपनासाठी गल्लीबोळात बांगड्या विकल्या (Motivational Story)

घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने झरिना खातून यांना मुलांचं संगोपन करण्यासाठी बांगड्या विकण्याचा व्यवसाय करावा लागला. डोक्यावर टोपली ठेवून त्या रस्त्यावरून गावोगावी, गल्लीबोळात बांगड्या विकण्यासाठी फिरायच्या. या बांगड्या विकूनच त्यांनी मुलाला शिकवलं. याबाबतीत झरीना यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. पतीच्या पश्चात त्यांनी न डगमगता बांगड्या विकून घर चालवले.

“आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली आणि तुमच्याजवळ सोई-सुविधा नसल्या तरी जर तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल,” असं दानिश सांगतो.

हे पण वाचा -
1 of 2

रेल्वेची नोकरी नाकारली

दानिशने श्रमिक विद्यालय टोपा पिंद्रा येथून 2013 मध्ये 10 वी ची परीक्षा 73 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर हजारीबागच्या मार्कहम कॉलेजमध्ये त्याने प्रवेश मिळवला. (Motivational Story) 12 वी च्या परीक्षेत त्याने 76 टक्के गुण मिळवले. 2019 मध्ये दानिशची रेल्वेत नोकरीसाठी निवड झाली होती; पण त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्याने रेल्वेची नोकरी स्वीकारली नाही. हजारीबागमध्ये राहून त्याने JPSC च्या परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रमाने दानिशने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

“आम्हाला दानिशचा अभिमान आहे”

दानिश त्याच्या यशाचं श्रेय त्याच्या आईला आणि शिक्षकांना देतो. दानिशच्या यशाबद्दल त्याची आई झरिना खातून म्हणाल्या, “त्याने माझी सगळी स्वप्नं पूर्ण केली आहेत. आम्हा सर्वांना दानिशचा अभिमान आहे. दानिशने मिळवलेलं यश हे त्याचे कठोर परिश्रम, चिकाटी आणि संघर्षाचं फळ आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com