MIDC Recruitment 2023 : राज्याच्या MIDC मध्ये मोठी भरती जाहीर!! ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; 802 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास (MIDC Recruitment 2023) महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 802 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी www.midcinda.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीनेच आपले अर्ज सादर करायचे आहेत.

संस्था – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
भरली जाणारी पदे – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)
पद संख्या – 802 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु – 2 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.१,०००/-
2. मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/-
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

काही महत्वाच्या तारखा – (MIDC Recruitment 2023)

भरतीचा तपशील –

असा करा अर्ज –
1. उमेदवारांना www.midcindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध होतील.
2. अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो. (MIDC Recruitment 2023)
3. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
“तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील” (Save & Next बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.
4. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.
5. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा. (Complete Registration)
“पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.

आवश्यक वय मर्यादा –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com