MHT CET Exam 2024 : CET परीक्षा नक्की केव्हा होणार? निवडणुकांमुळे परीक्षेच्या तारखा पुन्हा बदलल्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे रोजी होणार असल्यामुळे त्या दिवशी पीसीएम ग्रुपची कोणतीही परीक्षा होणार नाही, असे सीईटी सेलने (CET CELL) स्पष्ट केले आहे. देशभर होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे CET सेलने MH CET 2024 च्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे CET सेलने MH CET 2024 च्या तारखांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली आहे. अलीकडेच विविध अभ्यासक्रमांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ज्यामध्ये पीसीबी (PCB) आणि पीसीएम (PCM) या परीक्षा सुरुवातीला 16 ते 30 एप्रिल दरम्यान नियोजित केल्या (MHT CET Exam 2024) होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा कक्षाने नंतर कळवले की एमएचटी सीईटी परीक्षा 5 मे रोजी घेतली जाणार नाही आणि सुधारित परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

असं आहे सुधारित वेळापत्रक (MHT CET Exam 2024)
सुधारित वेळापत्रकानुसार, MH 5 वर्षांची LLB CET 17 मे ऐवजी 18 मे रोजी होणार आहे आणि MH नर्सिंग CET परीक्षा जी 18 मे रोजी होणार होती ती आता 24 आणि 25 मे रोजी होणार आहे. तसेच चार वर्षांची MAH-B.A./B.Sc. B.Ed. परीक्षा 18 मे रोजी होणार आहे. BHMCT CET परीक्षा 22 मे रोजी होणार आहे. तर BCA/BBA/BMS/BBMCET परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार आहे. तर MH-DPN/ PHN CET , MAH-PGP-CET / PGO-CET / M.Sc(A आणि SLP)-CET/M.Sc(P&O)-CET या परीक्षांच्या सुधारित तारखानंतर जाहीर केल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com