MHT CET 2024-25 : लोकसभा निवडणुकांमुळे MHT-CET सह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक (MHT CET 2024-25) प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनात बदल करण्यात आला आहे. येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे हा बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या असून, यामध्ये एमएचटी-सीईटीसह (MHT CET) विविध आठ परीक्षांचा समावेश आहे. सीईटी सेलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सीईटी सेलकडून 20 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात (MHT CET 2024-25) आले होते. दि. 16 ते30 एप्रिल या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षा होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

वेळापत्रकातील बदल असा आहे (MHT CET 2024-25)
सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा २२, २३, २४, २८ २९, ३० एप्रिल रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे रोजी होणार आहे. उपयोजित कला अभ्यासक्रम सीईटी १२ मे रोजी, बीए-बीएस्सी बीएड चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी १७ मे रोजी, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी १७ मे, नर्सिंग सीईटी १८ मे, हॉटेल मॅनेजमेंट पदवी सीईटी २२ मे, बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीए सीईटी २७ ते २९ मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com