Menstruation Leave : मोठी बातमी!! आता मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुट्टी

करिअरनामा ऑनलाईन । मासिक पाळी दरम्यान मुलींना (Menstruation Leave) होणारा शारीरिक त्रास लक्षात घेवून पंजाब विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान विद्यार्थिनींना सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाने मंजुरी दिली असून असा निर्णय घेणारे पंजाब विद्यापीठ (Punjab University) हे उत्तर भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

सुट्टीसाठी करावा लागणार अर्ज (Menstruation Leave)
विद्यापीठ प्रशासनाने सर्व विभागांना मासिक रजेबाबत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मासिक पाळी दरम्यान सुट्टी दिली जाणार आहे. या रजेसाठी विद्यापीठ प्रशासनाने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात (Menstruation Leave) उपलब्ध फॉर्म भरावा लागणार आहे. कॅलेंडरनुसार, विद्यार्थी मासिक पाळीमुळे एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकतात.परंतु किमान 15 दिवस अभ्यासासाठी येण्याच्या अटीवरच ही रजा दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.

केरळमधील कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान (Menstruation Leave) विद्यापीठाने जानेवारी 2023 मध्ये अशा पद्धतीची सुट्टी लागू केली होती. अशी सुट्टी लागू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले होते. आसामचे गुवाहाटी आणि तेजपूर युनिव्हर्सिटी, हैदराबादमधील नलसर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ या मासिक पाळीच्या रजा मंजूर करणाऱ्या देशातील इतर संस्था आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com