Mahindra Fellowship : परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्पं; महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट देणार भरगच्च स्कॉलरशिप; ‘या’ लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासात हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी (Mahindra Fellowship) पाहिलेले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने स्कॉलरशिप जाहीर केली आहे. देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे हे या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट 2023 पासून सुरू होणाऱ्या मात्र फेब्रुवारी 2024 च्या पुढे सुरू होणार नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते.

एवढी आहे शिष्यवृत्तीची रक्कम (Mahindra Fellowship)
‘के.सी. महिंद्रा फेलोज’ म्हणून सम्मान केलेल्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 10 लाख रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त, उर्वरित यशस्वी अर्जदारांना 5 लाख रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

अशी होणार निवड
शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरता अर्जदारांचे सातत्याने चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे आणि परदेशातील एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची (Mahindra Fellowship) शैक्षणिक कामगिरी, अभ्यासेतर उपक्रम आणि आर्थिक गरज यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.

‘विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे; हे आमचे उद्देश असल्याचे महिंद्रा समूहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सुश्री शीतल मेहता यांनी सांगितले. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविले तर असे विद्यार्थी केवळ त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे तर आपल्या देशाचे चांगले (Mahindra Fellowship) भविष्य घडविण्यातही मदत करेल असे त्या म्हणाल्या.
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट 1956 पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे. 2022 मध्ये, या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून 60 गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण 315 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. इच्छुक उमेदवार के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने आपली उच्च शिक्षणाची (Mahindra Fellowship) स्वप्ने पूर्ण करण्याची आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे चांगले भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता असलेल्या 8 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले आहे.

या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची लिंक – CLICK
अधिकृत वेबसाइट – https://www.kcmet.org/index.aspx
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com