करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार नेहमी महिलांसाठी (Maharashtra Government) अनेक नवनवीन योजना आणत असतात. अशातच विधानसभा निवडणुका अगदी जवळ येवून ठेपल्या असताना सत्ताधारी सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. ही चर्चा ताजी असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिला वर्गासाठी नोकरी मोठी संधी निर्माण केली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची मोठी घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. 31 ऑगस्ट 2024 अखेर इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अंगणवाडी मदतनीसांची 14,690 पदे रिक्त (Maharashtra Government)
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची तब्बल 14,690 रिक्त पदे आहेत. ती रक्त पदे भरण्यासाठी आता अधिसूचना निघालेली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र महिलांनी अर्ज करावा; असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा (Maharashtra Government) होणार आहेत. ज्या महिलांचे बँकेमध्ये खाते नाही त्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे ज्या महिलांची बँकेमध्ये खाती नाहीत त्यांना खाती खोलून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे; असे आवाहन देखील राज्य सरकारने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com