Job Resignation in India : काय सांगता!!! भारतात यंदा 86 टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, काय आहे कारण? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी (Job Resignation in India) त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे.

भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Recruitment Agency Michael Page च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, 86% कर्मचारी पुढील 6 महिन्यांत त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत. चांगल्या पगारासह Work Life Balance साठी कर्मचारी नोकरी सोडण्यास तयार असतात.

अहवाल काय सांगतो – (Job Resignation in India)

Recruitment Agency Michael Page च्या अहवालानुसार, 61 % असे कर्मचारी आहेत ज्यांना त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्ससाठी नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर नोकरीचा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येईल.

अशी आहेत कारणे –

मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांनी नोकरी सोडल्याचा परिणाम सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये दिसून येईल. या अहवालात सांगण्यात आले आहे की, पुढील काही महिन्यांत (Job Resignation in India) उत्कृष्ट प्रतिभा असलेले लोक आपली नोकरी सोडून अधिक पगार असलेली नोकरी शोधू शकतात. याशिवाय अनेक कार्यालयांमध्ये कोविडचे नियम पाळण्याबाबत वाद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर आवडले नाही, असे 11 टक्के कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.

नोकरी सोडण्यात भारतीय आघाडीवर –

अनेक कर्मचारी करिअर ग्रोथ, कमी पगार, करिअर रोल किंवा इंडस्ट्रीतील बदल आणि कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होऊन राजीनामा देत आहेत. 12 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्यात आघाडीवर आहेत. भारतातील बहुतेक कर्मचारी येत्या काही दिवसांत नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. (Job Resignation in India) भारतानंतर इंडोनेशिया, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि दक्षिण पूर्व आशियाचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी कर्मचारी नोकरी सोडण्यास अधिक इच्छुक आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com