करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात.
या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकॉउंट ऑफ इंडिया मधून चार्टर्ड अकॉउंटन्ट असणे ही अट आहे. याशिवाय जर तो इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकॉउंटस ऑफ इंडिया मधून अकॉउंटन्ट असल्यास ही चालणार आहे. उमेदवार चार्टर्ड अकॉउंटस संस्थेचा अथवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट चा सभासद असणे आवश्यक आहे. सोबत अकॉउंटस ओढ इंडिया मध्ये काम करणारा देखील असावा असे सांगण्यात आले आहे. तसेच उमेदवाराकडे १५ वर्षांचा अनुभव असावा अशी आत दिलेली आहे.
एअर इंडियाच्या या चीफ फायनान्शिअल ऑफिसर या पदासाठी दीड लाखाचा पगार देण्यात येणार आहे. उमेदवाराचे कमाल वय ५९ असावे असे सांगण्यात आले आहे. हा अर्ज इच्छूकांनी कागदपत्रांसह चीफ फायनान्शिअल ऑफिसर अलायन्स एअर पर्सनल डिपार्टमेंट अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ येथे पाठवावा अशी माहिती दिली आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com