IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS ची परीक्षा पास केली तर देशातील ‘या’ बँकेत नोकरी मिळालीच म्हणून समजा

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुणांचा मोठा वर्ग बँकेमध्ये (IBPS Clerk Recruitment 2023) नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. बरेच विद्यार्थी बारावी नंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी बँकिंग परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजेच इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS म्हणजे नेमकं काय  ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये नोकरी मिळू शकते हे जाणून घेऊया.

देशातील काही प्रमुख बँकांसाठी भरतीची घोषणा IBPS ने केली आहे. या परीक्षेची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत लिपिकांची 4045 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो उमेदवार IBPS परीक्षेला (IBPS Clerk Recruitment 2023) बसतात. देशातील तरुणांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही यासाठी IBPS लिपिक अधिसूचना 2022 तपासून अर्ज करू शकता.
IBPS लिपिक पदाच्या 4045 जागांच्या भरतीची जाहिरात इथे पहा – CLICK

काय आहे IBPS?
IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection. IBPS ही अशी एक संस्था आहे, जी बँकेतील नोकरीसाठी परीक्षा घेते. या संस्थेद्वारे भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. मात्र यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेचा समावेश होत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची परीक्षा वेगळी घेण्यात येते.

ही पात्रता आवश्यक (IBPS Clerk Recruitment 2023)
लिपिक पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केली असणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या रिक्त पदावर अर्ज करण्यास पात्र आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 28 वर्षांपेक्षा कमी नसावं. तसंच आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

‘या’ बँकेत मिळते नोकरी
1. बँक ऑफ इंडिया
2. कॅनरा बँक
3. इंडियन ओव्हरसीज बँक
4. युको बँक (IBPS Clerk Recruitment 2023)
5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
6. बँक ऑफ बडोदा
7. पंजाब नॅशनल बँक
8. युनियन बँक ऑफ इंडिया
9. इंडियन बँक
10. पंजाब अँड सिंध बँक
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com