करिअरनामा ऑनलाईन । मिथुन प्रेमराज या तरुणाचा प्रवास आजच्या (IAS Success Story) प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारा आहे. सर्वसाधारण नोकरी करणारा मिथून आपल्या मेहनतीच्या जोरावर आज IAS अधिकारी बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा करताना क्लास वन अधिकारी होणाचं स्वप्न मिथुनने पाहिलं. वेळेचे योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि अभ्यासातील सातत्यामुळे मिथुनने UPSC परिक्षेत मोठं यश संपादन केलं आहे. पाहूया एक तरुण डॉक्टर IAS पदापर्यंत कसा पोहचला याविषयी…
असा होता शैक्षणिक प्रवास (IAS Success Story)
मिथून हा एक होतकरू तरुण. कोरोना काळात तो हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये काम करायचा. तो लहानपणापासूनच शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट (IAS Success Story) ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ येथून पब्लिक हेल्थ डिप्लोमा पूर्ण केला.
जनसेवेचं बाळकडू घरतूनच मिळालं
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील वाटकारा येथे मिथुन प्रेमराजचे संपूर्ण कुटुंब राहते. त्याचा परिवार वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे. मिथुनचे वडील डॉ. प्रेमराज (IAS Success Story) हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ आहेत आणि त्याची बहीण अश्वती मुक्काम येथील के. एम. सी. टी. मेडिकल कॉलेजमध्ये रेडिओलॉजी विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टर आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी बनून जनतेची सेवा करण्याची प्रेरणा त्याला घरातूनच मिळत होती.
मेडिकलचे शिक्षण ते UPSC
मिथूनने त्याचे वैद्यकीय शिक्षण २०१५ मध्ये पूर्ण केले, पण आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे याची तयारी करायला त्याने सुरुवात केली आणि प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाने त्याला साथ दिली. असे असले तरीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नव्हते. एक वर्षाच्या (IAS Success Story) तयारीनंतर २०१६ मध्ये त्याने पहिल्यांदा परीक्षा दिली, पण तो या प्रयत्नात नापास झाला. तीन वेळा तो मुलाखतीच्या फेरीतही पोहोचला पण तिथे तो अपयशी ठरला. शेवटी पाचव्या प्रयत्नात म्हणजेच २०२० मध्ये तो यशस्वी झाला आणि त्याने ऑल इंडिया १२ वी रॅंक मिळवून आयएएस अधिकारी पदावर आपली मोहोर उमटवली.
कोरोना काळात केली रुग्णसेवा
मिथुनचे वय अवघे ३० वर्षे… पण एवढ्या कमी वयात त्याने कोझिकोड कॉर्पोरेशनमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि वाटकारा येथील जिल्हा (IAS Success Story) रुग्णालयात काम केले आहे. २०२० मध्ये त्यांने नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावली आहे. रुग्णसेवा करतानाच देशसेवा करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगलं आणि अभ्यासात सातत्य ठेवून त्याने UPSC परीक्षा पास केली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com