करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट आहे IAS चंद्रज्योती सिंह हिची.
IAS चंद्रज्योती सिंह हिने 2019 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 28 वा क्रमांक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. केवळ एक वर्षाच्या तयारीनंतर पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. चंद्रज्योती सिंह हिने यूपीएससीच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगची मदत न घेता स्वतः रणनीतीने तयार करुन सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पास केली आहे.
अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा (IAS Success Story)
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि केवळ सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होणं हे फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. पण ही अवघड वाटणारी कामगिरी चंद्रज्योती हिने करुन दाखवली आहे. तिने 2019 मध्ये झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये संपूर्ण देशात 28 वा क्रमांक मिळवून वेगळे स्थान प्राप्त केले. एवढच नव्हे, तर वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने ही परीक्षा पास क्रॅक केली आहे.
लहानपणापासून मनात आहे देशभक्ती
चंद्रज्योतीचे वडील दलबारा सिंग हे सेवानिवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि तिची आई मीना सिंह यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे. घरात सैन्याचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्यामध्ये देशसेवेची आवड निर्माण झाली त्यामुळे तिने IAS होण्याचे स्वप्न पाहिले.
ग्रॅज्युएशन नंतर घेतला ब्रेक
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर चंद्रज्योती सिंह हिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि नंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC CS) परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्यामध्ये इतका आत्मविश्वास होता, की अभ्यास करण्यासाठी ती केवळ सेल्फ स्टडीवर अवलंबून राहिली. त्यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही.
तुमची रणनीती तुम्हीच तयार करा (IAS Success Story)
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केलेल्या चंद्रज्योती सिंह हिने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना कोणत्याही परीक्षेसाठी रणनीती बनवून त्यानुसार तयारी करण्याचा सल्ला दिला. जर तुम्ही तुमची तयारी सोपी ठेवली आणि तुम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल; असं ती सांगते.
दररोज 6 ते 8 तास केला अभ्यास
UPSC च्या तयारीसाठी तिने दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर (IAS Success Story) विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com