IAS Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी; वाचा IAS अमित काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी (IAS Success Story) परराज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीत जन्माला आलेले IAS अधिकारी अमित काळे यांच्याबाबत.

IAS Success Story of Amit Kale

चौथ्या प्रयत्नात मारली बाजी

देशात UPSC ची परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला असतो. काहींना या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळते, तर काहींना यश मिळवण्यासाठी अनेक वर्षे झिजावं लागतं. अमित काळे यांनी चौथ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा पास करत आपले स्वप्न साकार केले आणि IAS पदावर आपली वर्णी लावली आहे.

अमित काळे यांच्या संघर्षाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. नागरी सेवा परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु अंतिम फेरीपर्यंत (IAS Success Story) ते पोहोचू शकले नाही. मात्र, दोनदा नापास होऊनही अमित यांनी कधीच हार मानली नाही आणि त्यांनी ध्येय गाठण्यासाठी फक्त अभ्यास सुरू ठेवला.

IAS Success Story of Amit Kale

2019 बॅचचे IAS अधिकारी

तिसर्‍या प्रयत्नात अमित यांनी पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली आणि त्यांना यामध्ये यशही मिळाले. पण त्यांना अजूनही अपेक्षित स्थान मिळाले नाही. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अमित यांनी समाधानी न राहता पुन्हा नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अखेरीस, अमित काळे यांनी 2018 मध्ये नागरी सेवा परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवले आणि त्यांना हवे असलेल्या IAS पदाला त्यांनी गवसणी घातली. 2018 मध्ये, जेव्हा अमित यांची अंतिम निवड झाली आणि ते 2019 च्या बॅचचे IAS अधिकारी झाले तेव्हा ते इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसमध्ये प्रशिक्षण घेत होते.

IAS Success Story of Amit Kale

UPSC देणाऱ्यांना मोलाचा सल्ला

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याऱ्या उमेदवारांना ते सांगतात; “उमेदवाराने आपल्या क्षमतेनुसार नियोजन आखलं पाहिजे; परीक्षेत तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करा. उरलेल्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर अवघड विषयांच्या तयारीसाठी वेळ काढून ठेवा. अभ्यासासोबतच वेळेच्या व्यवस्थापनावरही भर द्या. यासाठी तुम्ही दिलेल्या वेळेत मागील वर्षाचे पेपर सोडवण्याचा (IAS Success Story) सराव करू शकता,” असेही ते सांगतात.

अमित यांच्या मते, मर्यादित आणि निवडक पुस्तकांसह नागरी सेवा परीक्षेची तयारी करणं फायद्याचं ठरतं. याशिवाय तुम्ही अभ्यासासाठी इंटरनेट वापरू शकता. मात्र, अभ्यासासोबतच नियमित उजळणी आणि उत्तर लेखनाचा सराव आवश्यक आहे. या कठीण परीक्षेत एकाच वेळी यश मिळवणे खूप कठीण आहे, त्यामुळे अपयशी ठरल्यास निराश होण्याऐवजी दुप्पट उत्साहाने प्रयत्न करा, असा सल्लाही ते देतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com