करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी संघ लोकसेवा (IAS Businessman) आयोगाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या नोकरीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. IAS अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावर असतो. ही नोकरी करताना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक दर्जा पाहता ती नोकरी सहसा कोणी सोडेल, असा विचार कोणी कधी केला नसेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही IAS अधिकाऱ्यांविषयी माहिती देणार आहोत, ज्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आज आपल्याला लोक सरकारी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. सरकारी नोकरी कोणाला नको असते? मोठा पगार, निवृत्तीनंतर तगडी पेन्शन, समाजात मिळणारा मान सन्मान आणि सर्वांत (IAS Businessman) मोठी गोष्ट म्हणजे नोकरी गमावण्याचा कुठलाही धोका नाही. यामुळेच अनेकजण सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असतात. पण काही लोक असे असतात, जे आपली हौस पूर्ण करण्यासाठी कोणताही निर्णय अगदी सहज घेतात. ते वेळप्रसंगी चांगली नोकरी सोडतात. सरकारी नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्या अशाच IAS अधिकाऱ्यांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
संजय गुप्ता (IAS Businessman)
संजय गुप्ता हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. 2002 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी अदानी ग्रुपमध्ये सीईओ म्हणून काम केलं आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी स्वतःची लक्झरी हॉटेल चेन उभी (IAS Businessman) केली. सध्या संजय गुप्ता यांच्या विविध कंपन्या आहेत. 2011 मध्ये त्यांची गुजरातमधील पहिल्या मेट्रो रेल्वे निर्मितीसाठी निवड झाली होती.
डॉ. सैयद सबाहत अझीम
2000 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. सय्यद यांनी नोकरी सोडली आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यानं डॉ. सय्यद यांच्या (IAS Businessman) वडिलांचा मृत्यू झाला. या कारणास्तव त्यांनी सरकारी नोकरी सोडली, आणि स्वतःच्या वडिलांसारखी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुधारणा करण्यासाठी स्टार्टअप सुरू केलं. आज ते जिलोकल हेल्थ केअर सिस्टीम (Glocal Healthcare Systems) च्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहेत.
राजन सिंह
प्रथम आयआयटी आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजन सिंह तिरुअनंतपुरमचे पोलीस आयुक्त झाले. या पदावर त्यांनी 8 वर्षे काम केले. नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच त्यांचा कल अभ्यासाकडे (IAS Businessman) होता, म्हणून 2016 मध्ये त्यांनी कॉन्सेप्ट ओवल (Concept Owl) हा ऑनलाइन कोचिंग क्लास सुरू केला. राजन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मी अनेक उद्योगपतींना भेटलो, सर्वांमध्ये एकच गोष्ट समान आहे की, त्यांना धोका कसा घ्यायचा? हे माहीत होतं. या एकमेव कारणामुळे मला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची हिंमत मिळाली.’
प्रवेश वर्मा
मध्य प्रदेश केडरचे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवेश वर्मा यांनी 34 वर्षे सरकारी सेवेत राहिल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. नोकरी (IAS Businessman) सोडल्यानंतर त्यांनी ताजी फळं आणि भाजीपाला ऑनलाइन विकण्याचा स्वतःचा व्यवसाय ‘सब्जीवाला’ या नावाने सुरू केला. 34 वर्षांच्या शासकीय सेवेनंतर त्यांनी हे स्टार्टअप सुरू केलं. ‘सब्जीवाला’ हे एक असं स्टार्टअप आहे, जिथे फळं आणि भाजीपाला थेट शेतकऱ्याकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. आज ते या व्यवसायातून करोडोंची कमाई करीत आहेत.
रोमन सैनी (IAS Businessman)
रोमन सैनी हे एमबीबीएसची पदवी मिळवत डॉक्टर झाले. 6 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. ते पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयएएस अधिकारी बनले. 2014 मध्ये ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रोमनला यांना ही सरकारी नोकरी आवडली नाही, आणि दोन वर्षांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. सरकारी नोकरी सोडून त्यांनी अनअकॅडमी ही (IAS Businessman) एज्युटेक कंपनी सुरू केली.
दरम्यान, नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसा कमावता येतो, असं म्हटलं जातं. पण त्यासाठी कष्टही करण्याची तयारी ठेवावी लागते, हेच यावरून दिसून येतं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com