How to Become TTE in Railway : रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? काय आहे पात्रता आणि किती मिळतो पगार?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी मिळाली म्हणजे (How to Become TTE in Railway) आयुष्यभराची चिंता मिटल्यासारखे आहे. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE पदावर सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेमध्ये TTE होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे.

आपल्या देशात रेल्वेत नोकरी करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. बहुतांश (How to Become TTE in Railway) तरुणांचे रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. दरवर्षी रेल्वेत विविध विभागांतर्गत भरती केली जाते. यापैकी एक पद टीटीईचे आहे. TTE हे पद प्रवासी तिकीट परीक्षक म्हणूनही ओळखले जाते. तुम्हालाही टीटीई व्हायचे असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

TTE (Travelling Ticket Examiner) होण्यासाठी काय आहे आवश्यक पात्रता
1. प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
2. TTE होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 12वी पास केलेली असावी.
उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
3. शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासोबतच, अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अशी होणार निवड (How to Become TTE in Railway)
टीटीई होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागते.
या परीक्षेत उमेदवारांकडून एकूण 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
प्रश्नपत्रिकेत गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि सामान्य तर्क या विषयांचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेतील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी इत्यादींमध्ये भाग घ्यावा लागेल.
एवढा मिळतो पगार
TTE पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 9,400 रुपये ते 35,000 रुपये दरमहा पगार दिला जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com