How to Become Station Master in Railway : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचं आहे? येथे मिळेल संपूर्ण माहिती 

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो तरुण रेल्वेत (How to Become Station Master in Railway) नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेतील नोकरीकडे समाजात प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल, तर स्टेशन मास्टरची पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरेल. पण या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला रेल्वेने ठरवून दिलेल्या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. या भरतीसाठी घेतलेल्या चाचणी प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतीम केली जाते.

आज आम्ही तुमच्या सोयीसाठी स्टेशन मास्तर पदासाठी निवड होण्यासाठीच्या पात्रतेपासून ते निवडीपर्यंतची संपूर्ण माहिती येथे देत आहोत, ही माहिती तुम्हाला तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अशी होते निवड (How to Become Station Master in Railway)
स्टेशन मास्टर पदासाठी भरती झाल्यानंतर, तुम्हाला त्यात सामील होण्यासाठी अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पहिल्या टप्प्यात संगणक चाचणी (CBT) मध्ये भाग घ्यावा लागेल. CBT परीक्षेत उमेदवारांना गणित, सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी विषयांचे प्रश्न विचारले जातात.

असे असतात परीक्षेचे टप्पे 
पहिल्या टप्प्याच्या परीक्षेत विहित कटऑफ गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्य परीक्षेला बसावे लागते. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या (How to Become Station Master in Railway) उमेदवारांना शेवटी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीस बसावे लागते. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची स्टेशन मास्टरच्या रिक्त जागांवर नियुक्ती केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com