Health Department Recruitment 2023 : महाराष्ट्र आरोग्य विभागात 11 हजार पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात; लगेच करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून (Health Department Recruitment 2023) रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहीरात महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सुरुवात झाली असून, पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
महाआरोग्य विभाग भारती २०२३ ची अधिसूचना गट क आणि गट ड संवर्गासाठी जाहीर करण्यात आली असून, या भरतीअंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट आणि ड्रायव्हर आणि इतर पदांचा समावेश आहे. तर, गट ड संवर्गातील हवालदार, सफाई कामगार आणि इतर अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

विभाग – महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग
भरले जाणारे पद – (Health Department Recruitment 2023)
1. आरोग्य विभाग ‘गट क’ – ६९३९ पदे
2. आरोग्य विभाग ‘गट ड’ – ४०१० पदे
पद संख्या – १० हजार ९५९ पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023

राज्यातील कोणत्या विभागात किती पदे –
1. मुंबई आरोग्य सेवा मंडळ : ८०४ पदे
2. पुणे आरोग्य सेवा मंडळ : १६७१ पदे
3. नाशिक आरोग्य सेवा मंडळ : १०३१ पदे
4. कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ : ६३९ पदे
5. औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ : ४७० पदे
6. लातूर आरोग्य सेवा मंडळ : ४२८ पदे
7. अकोला आरोग्य सेवा मंडळ : ८०६ पदे
8. नागपूर आरोग्य सेवा मंडळ : १०९० पदे
आरोग्य विभाग ‘गट क’ वर्गातील एकूण रिक्त जागा : ६९३९ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
परिक्षा फी –
1. अमागास : १,०००/- रुपये
2. मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस : ९००/- रुपये
3. माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही

अशी आहे निवड प्रक्रिया –
1. गट क पदांसाठी –
एकूण १०० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुणांची याप्रमाणे २०० गुणांची परीक्षा राहील
2. लिपिक वर्गीय पदांसाठी –
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्नांकरिता २०० गुणांची परीक्षा असेल
3. तांत्रिक संवर्गातील पदांसाठी – (Health Department Recruitment 2023)
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असतील.
4. वाहन चालक पदाकरिता –
मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण ६० प्रश्न राहील व पदसंधर्भात ४० प्रश्न असेल
5. गट ड पदांकरिता –
– एकूण ५० प्रश्न १०० मार्कांसाठी असतील.
– परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ असेल.
– लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नसाठी २ गुण, एकूण गुण -१०० परीक्षेचा कालावधी – २ तास
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेवर केली जाईल.
– गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयासाठी अर्ज करायचा ही उमेदवारांची निवड राहील.

आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा
2. एस.एस.सी. अथवा १० वी तत्सम शैक्षणिक आर्हता.
3. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
4. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
5. वयाचा पुरावा
6. शैक्षणिक आर्हता इत्यादीचा पुरावा
7. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
8. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
9. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. नावात बदल झाल्याचा पुरावा (Health Department Recruitment 2023)
11. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
12. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
13. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
14. अधिवास प्रमाणपात्र
15. मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा
16. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
17. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
18. अनुभव प्रमाणपत्र
19. लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र

काही महत्वाच्या लिंक्स – (Health Department Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com