Graphic Designing : 10 वी, 12 वी नंतर शिका ग्राफिक डिझायनिंग; भरघोस कमाईचे अनेक पर्याय उपलब्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या (Graphic Designing) आहेत. 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. बोर्डाच्या परीक्षा दिल्यानंतर मुलांसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यापैकी कोणता मार्ग निवडायचा याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण इथे ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही चांगली नोकरी मिळवून लाखोंमध्ये कमाई करू शकता.

विद्यार्थी असोत किंवा पालक… प्रत्येकालाच आपल्या मुलाने असे (Graphic Designing) काहीतरी करावे, जेणेकरून त्याला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळेल असं वाटत असतं. तुम्हीही असा विचार करत असाल आणि तुम्ही सर्जनशील असाल तर ग्राफिक डिझायनिंग कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम डिप्लोमा/पदवी/प्रमाणपत्र या स्तरावर उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश घेऊ शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करू शकाल.

नोकरीसाठी अनेक पर्याय उपलब्ध (Graphic Designing)
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक लहान-मोठा राजकीय पक्ष, छोट्या-मोठ्या कंपन्या आणि अगदी सरकारी कंपन्याही आपल्या प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझायनर्सना चांगल्या पगारावर नोकऱ्या देतात.

10वी/12वी नंतर सुरू करता येईल अभ्यास
जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल आणि तुम्ही (Graphic Designing) नुकतीच 10वी किंवा 12वी परीक्षा पास केली असेल, तर तुमच्यासाठी या क्षेत्रात पूर्णवेळ अंडरग्रॅज्युएट पदवी घेणे अधिक चांगले होईल. याशिवाय तुम्ही या अभ्यासक्रमात डिप्लोमा देखील मिळवू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले असेल तर डिप्लोमा करणं तुमच्यासाठी अधिक चांगलं ठरू शकतं.

चित्रपट आणि जाहिरातींच्या दुनियेत मिळू शकते काम
जर तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्ही चित्रपटसृष्टीतही करिअर करू शकता. इथे तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला अगदी लाखात पगार मिळतो. याशिवाय तुम्ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये (Graphic Designing) येणाऱ्या जाहिरातींमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून जास्त पैसेही कमवू शकता.

मिळतो एवढा पगार
या क्षेत्रात तुम्ही 15 ते 25 हजार रुपये दरमहा पगार घेऊन सुरुवात करू शकता, परंतु वेळ आणि अनुभवानुसार हा पगार लाखांपर्यंत पोहोचतो. तुम्ही प्रत्येक प्रकल्पाच्या आधारावर (Graphic Designing) देखील काम करू शकता. या क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणून काम करण्याबरोबरच अनुभव मिळवल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची कंपनी उघडून लोकांच्या मागणीप्रमाणे प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझाइनही करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com