Government Megabharti : खुशखबर!! महाविकास आघाडी करणार मेगाभरती; तब्बल 1 लाख पदे भरली जाणार

करिअरनामा ऑनलाईन। केंद्र सरकारनंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही (Government Megabharti) शासकीय विभागांमधील पावणेतीन लाख रिक्तपदांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगाभरती करण्याचे नियोजन सुरु केले आहे. मागील चार-पाच वर्षांत सरकारतर्फे मोठी पदभरती झालेली नाही. त्यामुळे आता प्रत्येक विभागांकडील मंजूर व रिक्तपदांची बिंदुनामावली (आरक्षण पडताळणी) अंतिम करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे.

राज्याच्या 43 शासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीत तब्बल दोन लाख 69 हजार पदे रिक्त आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 60 हजार पदांची मेगाभरती घोषित केली. पण, विविध अडचणींमुळे मेगाभरती होऊ शकली नाही. त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द करावा लागला. आता महाविकास आघाडी सरकारने सर्व (Government Megabharti) विभागांमधील रिक्त जागांची माहिती मागवली असून त्याची आरक्षण पडताळणी सुरु केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारला 2024 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी दूर करण्यासाठी 10 लाख पदांची भरती करण्याची मोठी घोषणा केली. त्या धर्तीवर अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या ठाकरे सरकारनेही आगामी निवडणुकांपूर्वी दोन लाख पदांच्या मेगाभरतीचे नियोजन केले आहे. जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांच्या नाराजीचा फटका बसणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.

दुसरीकडे सत्तेत अडीच वर्षे होऊनही महाविकास आघाडी सरकारचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नाही. शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित लाभार्थींना योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, हाही त्यामागील हेतू आहे. जुलै ते डिसेंबर 2022 या सहा महिन्यांत टप्प्याटप्याने एक लाख पदांची भरती होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. साधारणत: दोन ते तीन टप्प्यात सप्टेंबर 2024 पर्यंत दीड ते दोन लाख पदांची भरती होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

दोन लाख पदांच्या भरतीचे नियोजन (Government Megabharti)

“महाविकास आघाडी सरकारने दोन लाख शासकीय पदांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. ही भरती प्रक्रिया राज्य, विभागीय व जिल्हा स्तरावर राबविली जाणार आहे. जिल्हा परिषदांसह शासनाच्या विविध विभागांमधील रिक्तपदांचा त्यात समावेश असेल.” असं सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

मेगाभरतीची अंदाजित पदे –

  • गृह – 15,000 पदे
  • सार्वजनिक आरोग्य – 24,000 पदे
  • जलसंपदा – 14,000 पदे
  • महसूल व वन – 13,500 पदे
  • वैद्यकीय शिक्षण – 13,000 पदे
  • सार्वजनिक बांधकाम – 8,000 पदे
  • इतर – 12,500 पदे

काही ठळक बाबी –

  • राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत.
  • काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
  • त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. (Government Megabharti)
  • वित्त विभागाने विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com