Government Jobs : 12वी ते ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! राज्याच्या महिला बालविकास विभागात ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण महिला बालविकास मंडळ अंतर्गत (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी, MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर/ शिपाई या पदांच्या एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
संस्था – ग्रामीण महिला बालविकास मंडळ, महाराष्ट्र शासन
भरली जाणारी पदे – (Government Jobs)
1. क्षेत्र प्रकल्प अधिकारी
2. HRM प्रकल्प अधिकारी
3. MIS प्रकल्प अधिकारी
4. क्षेत्र पर्यवेक्षक
5. डेटा व्यवस्थापक
6. डेटा एंट्री ऑपरेटर
7. परिचर/ शिपाई
पद संख्या – 21 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (Government Jobs)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. फील्ड प्रोजेक्ट ऑफिसर – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक. तसेच कृषी/सामाजिक कार्य किंवा भूमिकेशी संबंधित क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.
2. HRM प्रकल्प अधिकारी – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक. प्राधान्याने व्यवसाय प्रशासन, कामगार कायदे आणि मानवी संसाधने असणं आवश्यक.
3. एमआयएस प्रकल्प अधिकारी – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक. M.Com, M.B.A (फायनान्स) यांना प्राधान्य दिले जाईल. (Government Jobs)
4. फील्ड पर्यवेक्षक – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक. कृषी, समाजकल्याण किंवा भूमिकेशी संबंधित क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.
5. डेटा मॅनेजर – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक. भूमिकेशी संबंधित क्षेत्रातील पदवीला प्राधान्य दिले जाईल.
6. डेटा एंट्री ऑपरेटर – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक.
7. परिचर / शिपाई – उमेदवार 12 वी पास असणं आवश्यक.

मिळणारे वेतन – (Government Jobs)
10,000/- रुपये ते 25,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याचा पत्ता –
उप. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ मुख्य कार्यालय, जन्मनागल बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग, 3रा मजला S.NO.7A/2, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे 411 013.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gmbvm.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com