Google Recruitment : Googleमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ पदावर होणार मोठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । जगभर प्रसिद्ध असलेल्या गूगलमध्ये नोकरी (Google Recruitment) करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही देखील गूगलमध्ये नोकरी शोधत असाल तर महत्वाची अपडेट समोर आली आहे.

गूगल अंतर्गत सॉफ्टवेअर इंजिनीअर III, सिक्योरिटी/ प्रायव्हसी, गूगल क्लाऊड ही पदे भरली जाणार आहेत. गूगलचे सॉफ्टवेअर इंजिनीअर पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसित करतात. यामुळे अब्जावधी वापरकर्ते माहिती आणि एकमेकांशी कसे कनेक्ट होतात, एक्सप्लोर करतात आणि संवाद साधतात. गूगलच्या (Google Recruitment) उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर माहिती हाताळण्याची आणि वेब सर्चच्या पलीकडे विस्तारित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गूगलद्वारे मोठ्या प्रमाणात सिस्टम डिझाइन, नेटवर्किंग आणि डेटा स्टोरेज, सुरक्षा, आर्टिफिशल इंटेलिजन्स, UI डिझाइन आणि मोबाइल यासह सर्व क्षेत्रांमधून नवीन कल्पना आणल्या जात आहेत.

संस्था – गुगल (Google)

भरली जाणारी पदे – (Google Recruitment)

सॉफ्टवेअर इंजिनीअर III

सिक्योरिटी/ प्रायव्हसी

गूगल क्लाऊड

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सॉफ्टवेअर इंजिनीअर III –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक (Google Recruitment) क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणे आवश्यक आहे.

  • सिक्योरिटी/ प्रायव्हसी –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक किंवा अधिक प्रोग्रामिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसह २ वर्षांचा अनुभव असावा. डेटा गोपनीयता किंवा सुरक्षिततेसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचा २ वर्षांचा अनुभव असावा.

  • गूगल क्लाऊड –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डेटा स्ट्रक्चर्स किंवा अल्गोरिदमसह २ वर्षांचा अनुभव आणि डेव्हलपिंग एक्सिसेबल टेक्नोलॉजीचा अनुभव असावा. (Google Recruitment)

या भरतीद्वार एक सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून, तुम्ही गूगलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एका विशिष्ट प्रकल्पावर कार्य कराल, ज्यामध्ये तुम्ही स्वत:चा (Google Recruitment) आणि गूगलचा व्यवसाय वाढविण्यास आणि विकसित करण्यास मदत होईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अष्टपैलू, नेतृत्वगुण आणि तंत्रज्ञानाला पुढे नेत नवीन समस्यांना तोंड देण्यासाठी उत्साही असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://careers.google.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com