GK Updates : शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ‘हार्ड करन्सी’ कशाला म्हणतात? वाचायलाच हवेत असे प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर- आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे.
प्रश्न- भारतातील पहिल्या रेल्वेने किती अंतर कापले होते?
उत्तर- भारतात पहिली ट्रेन 34 किलोमीटर धावली होती.

प्रश्न- बैल आणि अस्वल (GK Updates) व्यापाराच्या कोणत्या पैलूशी संबंधित आहेत?
उत्तर- बैल आणि अस्वल हे दोन प्राणी तेजी आणि मंदी शेअर बाजाराशी संबंधित आहेत.
प्रश्न – ‘हार्ड करन्सी’ चा अर्थ काय आहे?
उत्तर – ‘हार्ड करन्सी’ चा अर्थ म्हणजे ज्या चलनाचा पुरवठा मागणीपेक्षा कमी आहे.

प्रश्न – ज्या रंगांपासून इतर रंग बनवले जातात त्यांची मूळ रंगांची नावे तुम्हाला माहिती आहेत का?
उत्तर – मूळ रंग पिवळा हा लाल आणि निळा आहे. हे तीन रंग इतर रंगांचा आधार आहेत आणि त्यांच्यापासून इतर रंग देखील तयार केले जाऊ शकतात.
प्रश्न – (GK Updates) ते काय आहे जे न खाल्या-पिल्याशिवाय जगते, ना हसते, ना रडते, तरी सर्वांचे घर सांभाळते?
उत्तर – ती वस्तू कुलूप आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com