GK Updates : जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे दिलीत तर समजेल तुम्ही किती बुध्दिमान आहात…

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न- लाइफ टाईम अचिव्हमेंटसाठी ऑस्कर पुरस्कार विजेत्याचे नाव?
(अ) सत्यजित रे
(ब) भानू अथैया
(क) रवींद्रनाथ टागोर
(डी) किरण बेदी (GK Updates)
उत्तर – (अ) लाइफ टाईम अचिव्हमेंटसाठी ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे होते.
प्रश्न- भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
अ) चंदीगड
(ब) मिझोराम
(क) सिक्कीम
(ड) गोवा
उत्तर – (क) सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार, सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. येथील एकूण लोकसंख्या 6,10,577 इतकी आहे.

प्रश्न- भारताच्या केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री? (GK Updates)
(अ) शन्नो देवी
(ब) बी. एस. रमा देवी
(क) राजकुमारी अमृत कौर
(ड) प्रिया हिमोरानी
उत्तर – (क) राजकुमारी अमृत कौर
प्रश्न- भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?
(अ) इंदिरा गांधी
(ब) अमृता प्रीतम
(क) सरोजिनी नायडू
(ड) सुचेता कृपलानी
उत्तर – (डी) भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या, त्यांनी 1963 ते 1967 पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले.

प्रश्न- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?
(अ) प्रतिभा पाटील
(ब) सुचेता कृपलानी
(क) इंदिरा गांधी (GK Updates)
(ड) इतर
उत्तर – (अ) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव प्रतिभा पाटील आहे. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
प्रश्न- भारताचे पहिले व्हाईसरॉय?
(अ) सर जॉन शोर
(ब) लॉर्ड कॅनिंग
(क) लॉर्ड विल्यम बेंटिक
(ड) अर्ल कॉर्नवॉलिस
उत्तर – (ब) लॉर्ड कॅनिंग
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com