GK Updates : तिरंगा ध्वजाची रचना कोणी केली? क्रिकेट पिचची लांबी किती असते? गोंधळात टाकणारे प्रश्न

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – बिर्ला मंदिर कोठे आहे आणि ते कोणाला समर्पित आहे?
उत्तर – बिर्ला मंदिर नवी दिल्ली येथे आहे (GK Updates) आणि ते भगवान श्री कृष्णाला समर्पित आहे.
प्रश्न 2 – क्रिकेट खेळपट्टीची लांबी किती असते?
उत्तर – क्रिकेट खेळपट्टीची लांबी 22 फूट असते.

प्रश्न 3 – (GK Updates) भारतातील कोणत्याही राज्याच्या राज्यपालांना शपथ कोण देतो?
उत्तर – भारताच्या कोणत्याही राज्यपालाला शपथ त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात.
प्रश्न 4 – “सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा…” ही घोषणा कोणी दिली आहे?
उत्तर –“सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा…” ही घोषणा मोहम्मद इक्बाल यांनी दिली होती.

प्रश्न 5 – बांगलादेशच्या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत?
उत्तर – बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिणारे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत.
प्रश्न 6 – (GK Updates) भारताच्या तिरंगा ध्वजाची रचना कोणी केली?
उत्तर – भारताच्या तिरंगा ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी 1921 मध्ये केली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com