GK Updates : सूर्याच्या जास्त जवळचा ग्रह कोणता? भारतातील पहिल्या स्वदेशी संगणकाचे नाव काय?

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – सूर्याच्या (GK Updates) सर्वात जास्त जवळ असलेला ग्रह कोणता आहे?
उत्तर – सूर्याच्या सर्वात जास्त जवळ असलेल्या ग्रहाचे नाव बुध आहे.
प्रश्न 2 – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय दुबई येथे आहे.

प्रश्न 3 – ‘मजलिस’ हे कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे?
उत्तर – मजलिस हे मालदीवच्या संसदेचे नाव आहे. (GK Updates)
प्रश्न 4 – भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाचे नाव काय आहे?
उत्तर – भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाचे नाव ‘वासुकी’ आहे.

प्रश्न 5 – अलाहाबाद किल्ला कोणी बांधला आहे?
उत्तर – अलाहाबाद किल्ला जलालुद्दीन अकबरने बांधला होता.
प्रश्न 6 – (GK Updates) भारतातील पहिल्या स्वदेशी संगणकाचे नाव काय होते?
उत्तर – भारतातील पहिल्या स्वदेशी संगणकाचे नाव सिद्धार्थ होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com