GK Updates : 8 हा अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 कसे येईल ते सांगा? मुलाखतीत चक्रावून सोडणारे प्रश्न पहा

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. (GK Updates) तुम्ही फक्त 2 वापरून 23 कसे लिहू शकता?
उत्तर: 22+2/2
प्रश्न 2. एक टेबलावर, एका प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, 3 लोकांना ते खायचे आहेत, मग ते तिघे कसे खातील?
उत्तरः एक टेबलावर आणि प्लेटमध्ये दोन सफरचंद आहेत, म्हणजे एकूण तीन सफरचंद आहेत. तिन्ही पुरुष प्रत्येकी एक सफरचंद खातील. (GK Updates)
प्रश्न 3. तुमच्या शहरात किती ट्रैफिक लाइट्स आहेत?
उत्तरः हा प्रश्न ऐकणारे बहुतेक लोक त्यांच्या शहरातील वाहतूक सिग्नल मोजू लागतात. तर इथे ट्रॅफिक लाइट्सबद्दल प्रश्न विचारला गेला आहे, जे कुठेही गेला तरी फक्त तीन प्रकारचे लाइट्स असतात. लाल, हिरवा आणि पिवळा.

प्रश्न 4. 8 अंक 8 वेळा लिहून उत्तर 1000 येईल, कसे ते सांगा?
उत्तर: 888+88+8+8 +8= 1000
प्रश्न 5. जर वास्तविक वेळ 12:30 असेल तर अशा स्थितीत प्रतिबिंबात किती वेळ दिसेल.
उत्तर: 11:30
प्रश्न 6. असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर नेहमी बदलत असते?
उत्तर: ‘किती वाजले?’ (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com