करिअरनामा ऑनलाईन। विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारे अनेक प्रश्न UPSC/MPSC मुलाखतीदरम्यान (GK Updates) विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. या प्रश्नांची उत्तरे देताना भल्याभल्यांची कसोटी लागते. आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात. पाहूया तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत का?
प्रश्न – सियाचीन चा प्रश्न सध्या गंभीर मुद्दा बनला आहे, तुम्ही काय करू शकता ?
उत्तर – आपण सियाचीनवर पायाभूत सुविधा विकसित करत आहोत. परंतु आपण अधिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे चीनने आपल्या सीमेवर अतिशय चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळं चीनच्या झोकात काही संतुलन जात आहे. त्याचाही समतोल राखण्यासाठी, आपण आपला रस्ता ज्या प्रकारे बांधत आहोत त्याप्रमाणे विकसित केला पाहिजे. सियाचीनवरील आपले नियंत्रण अधिक महत्त्वाचे आहे कारण ते क्षेत्र असे आहे की तेथे चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकतात. त्यामुळे भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे क्षेत्र, तेथे आपला प्रभाव आवश्यक आहे. नियंत्रण रेषेवर चीनशी आमची चर्चा सुरू आहे. ते कमी घर्षण बिंदूसह चालले पाहिजे. असे असूनही तिथली ताकदही वाढवली पाहिजे.
प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे जी लोखंड खेचू शकते परंतु रबर नाही ?
उत्तर – चुंबक
प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे, जी थंड झाल्यावर काळी, गरम झाल्यावर लाल आणि फेकल्यावर पांढरी होते ?
उत्तर – कोळसा
प्रश्न – अशी कोणती गोष्ट आहे की, ती ओली झाली तर 1 किलो, सुकली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते ?
उत्तर – सल्फर
प्रश्न – असा कोणता जीव आहे जो पायाने चव (Taste) घेतो.
उत्तर – फुलपाखरू
प्रश्न – गंगेला पद्मा नावाने कुठे संबोधलं जातं ?
उत्तर – बांगलादेशात गंगेला पद्मा नावाने संबोधलं जातं ?
प्रश्न – असं काय आहे, जे लहान बाळाला तरुण अन् तरुणाला वृद्ध बनवते ?
उत्तर – वय
प्रश्न – असं काय आहे जे तुमच्या आजूबाजूला जेवढं जास्त तेवढं तुम्हाला कमी दिसतं ?
उत्तर – अंधार
प्रश्न – महात्मा गांधींनी संपादित केलेल्या इंग्रजी साप्ताहिकाचे नाव काय होतं ?
उत्तर – यंग इंडिया
प्रश्न – नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते?
उत्तर – रवींद्रनाथ टागोर (1913 मध्ये)
प्रश्न – मानवी डोळ्याचे वजन किती असतं ?
उत्तर- मानवी डोळ्याचे वजन फक्त 7.5 ग्रॅम आहे.
अतिरिक्त माहिती – मानवी डोळ्याचं वजन फक्त 0.25 ounce म्हणजे 7.5 grams असतं. डोळ्याची साइज ही 0.4 cubic inch म्हणजे 6.5 cm3 असते. किती गंमत आहे ना, 75 किलोच्या मानवी शरीरात 7.5 ग्रॅमचा डोळा इतका महत्त्वाचा आहे की, तो नसेल तर संपूर्ण शरीर निरुपयोगी ठरतं.
प्रश्न – भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं ?
उत्तर – 1 महाराष्ट्र GDP – 32.24 लाख कोटी / 2 ) तामिळनाडू GDP – 17.25 लाख कोटी / 3 ) कर्नाटक GDP – 17.05 लाख कोटी 4) उत्तर प्रदेश GDP – 15.80 लाख कोटी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com