GK Updates : मुलाखतीत विचारतात असे जनरल नॉलेजचे प्रश्न; एकदा वाचाच…

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर – अरुणाचल टेकड्या तामिळनाडू राज्यात आहेत.
2. स्वतंत्र खलिस्तानची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती?
उत्तर – स्वतंत्र खलिस्तानची मागणी पंजाब (GK Updates) राज्यात करण्यात आली होती.
3. 2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते?
उत्तर – 2001 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते.
4. विधान परिषद किती राज्यात आहे?
उत्तर – देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे.
5. ओडिशा राज्यातील प्राणी?
उत्तर – ओडिशा राज्यात वाघ, हत्ती व चित्ते विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात.

6. घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक कोण करतात?
उत्तर – घटक राज्यात राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते.
7. ईशान्येकडील कोणत्या राज्यात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?
उत्तर – (GK Updates) भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश.
8. कामाख्या हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – कामाख्या हे शक्तिपीठ आसाम राज्यात आहे.
9. अटल बोगदा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – अटल बोगदा हिमाचल प्रदेश या राज्यात आहे.
10. प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?
उत्तर – जगातील पहिली लोकशाही अथेन्समध्ये होती. पाचव्या शतकाच्या आसपास एथेनियन लोकशाही विकसित झाली होती.

11. भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते?
उत्तर – भारतात सर्वांत कमी साक्षरता बिहार राज्यात आढळते.
12. लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
13. एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – एलिफंटा धबधबा मेघालय राज्यात आहे.
14. मीराबाई चानू कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर – (GK Updates) मीराबाई चानू मणिपूर राज्यात जन्माला आल्या होत्या.
15. जश्न हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्यात रूढ आहे?
उत्तर – जश्न हा लोकनाट्याचा प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्यात रूढ आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com