करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत.
1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?
उत्तर : धुळे
2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?
उत्तर : गो. कु. गोखले
3) यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर
4) अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख
5) हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म
6) खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर : रघुनाथराव परांजपे
7) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?
उत्तर : अहिल्याबाई होळकर
8) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले?
उत्तर : गडचिरोली
9) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
उत्तर : वैनगंगा
10) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते?
उत्तर : सामाजिक न्याय दिन
11) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात?
उत्तर : औरंगाबाद
12) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : जळगाव
13) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर : मध्य प्रदेश
14) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?
उत्तर : निर्मळ रांग
15) दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर : Lignite
16) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर : औरंगाबाद (GK Updates)
17) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
उत्तर : पाचगणी
18) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर : महाराष्ट्र
19) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?
उत्तर : शेगाव
20) महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?
उत्तर : एप्रिल 2005
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com