GK Update : सरकारी परीक्षेत विचारले जाणारे कोरोनावर आधारित प्रश्न तुम्हाला माहित असायलाच हवेत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। बहुतांश सरकारी भरती परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य (GK Update) ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे.
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभर हाहाकार माजला आहे. करोना हा आजार पसरवणाऱ्या कोव्हिड – १९ विषाणू संदर्भात देखील या परीक्षांमध्ये यापुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असे ९ महत्त्वाचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत.

प्रश्न क्र. १

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?

उत्तर – उत्तर प्रदेश

प्रश्न क्र. २ (GK Update)

आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील?

उत्तर – आयुष्मान भारत – पंतप्रधान जन आरोग्य योजना

प्रश्न क्र. ३

भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला ?

उत्तर – आरोग्य सेतू

प्रश्न क्र. ४

ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला?

उत्तर – मालदीव (GK Update)

प्रश्न क्र. ५

RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?

उत्तर – १५ टक्के

प्रश्न क्र. ६

कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक COVID-19 चॅटबोट लाँच केला आहे?

उत्तर – फेसबुक

प्रश्न क्र. ७

अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?

उत्तर – वैज्ञानिक

प्रश्न क्र. ८

बेनी प्रसाद वर्मा हे कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते?

उत्तर – समाजवादी पार्टी

प्रश्न क्र. ९

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाऊन काळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी ‘Stranded in India’ पोर्टल सुरू केलं आहे?

उत्तर – पर्यटन मंत्रालय

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com