Full Forms : हे आहेत UPSC, IAS, SSC, PSC, MTS, CGL, CHSL, IBPS, CTET, NDA, CDS, IIT, ITI, NTA चे फुल फॉर्म

करिअरनामा ऑनलाईन । विविध शैक्षणिक, प्रवेश, पात्रता आणि (Full Forms) भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ते ज्या परीक्षेला बसणार आहेत त्याचे नाव आणि ती आयोजित करणारी संस्था माहीत असते. पण अनेक वेळा असं होतं की आपल्याला अनेक सरकारी पदे किंवा सरकारी संस्थांचे फुल फॉर्म (Full Form) माहित नसतात. यासाठी उमेदवार गुगलवर (Google) सर्च करत राहतात. नवीन उमेदवार, जे प्रथमच या परीक्षांना बसणार आहेत, त्यांना देखील ही नावे माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग आज आपण ही समस्या सोडवूया. जाणून घेवूया सरकारी पदे, सरकारी परीक्षा आणि सरकारी संस्थांचे पूर्ण नाव (Full Form).

1. UPSC – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
2. IAS – भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administration Services)
3. PSC – राज्य लोकसेवा आयोग (Public Service Commission)
4. PCS – राज्य नागरी सेवा (Provincial Civil Service)
5. SSC – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
6. MTS – मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)
7. CGL – एकत्रित पदवी स्तर (Combined Graduate Level)
8. CHSL – एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (Combined Higher Secondary Level)
9. IBPS – बँकिंग कर्मचारी निवड संस्था (Institute of Banking Personnel Selection)
10. PO – प्रोबेशनरी ऑफिसर ( Probationary Officer)

11. IBPS RRB – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन प्रादेशिक ग्रामीण बँक्स (Institute of Banking Personnel Selection – Regional Rural Banks)
12. NDA – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy)
13. CDS – एकत्रित संरक्षण सेवा (combined defence services)
14. CMS – एकत्रित (Full Forms) वैद्यकीय सेवा (combined medical services)
15. UGC – विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission)
16. CTET – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test)
17. AFCAT – हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (Air Force Common Admission Test)
18. IIT – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute Of Technology)
19. ITI – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute)
20. NTA – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency)
21. CBSE – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com