Free Education : आंतरराष्ट्रीय विद्यापीठ देतंय शिक्षण अगदी फ्री!! ‘हा’ अभ्यासक्रम शिका आणि महिन्याला लाखोंत कमवा 

करिअरनामा ऑनलाईन । नामांकित विद्यापीठात आपले (Free Education) शिक्षण व्हावे; अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. उत्तम दर्जाचे शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्ही ज्या पद्धतीचे शिक्षण घ्याल किंवा ज्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण कराल त्याच क्षेत्रामध्ये किंवा त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या नोकऱ्या तुम्हाला मिळतात.
जर नामांकित विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागतात. ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य होते असं नाही. अभ्यासक्रमानुसार त्यासाठीचे डोनेशन किंवा फी तुम्हाला भरावी लागते. जर जगामध्ये प्रसिद्ध व अव्वल स्थानावर असलेल्या विद्यापीठांमध्ये जर तुम्हाला फ्री मध्ये एखादा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि येथे घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून जर तुम्हाला लाख रुपये पगाराची नोकरी मिळत असेल तर तर सोने पे सुहागाच म्हणावे लागेल.

अगदी अशीच संधी जागतिक स्तरावर नाव लौकिक असलेल्या ‘स्टॅनफोर्ड विद्यापीठा’ने उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
स्टॅनफोर्ड विद्यापीठ देतंय मोफत कोर्स
जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेले व अव्वल स्थान मिळवलेल्या (Free Education) स्टॅनफोर्ड विद्यापीठ होतकरु विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतपणे कोर्स पूर्ण करण्याची संधी देत आहे. या माध्यमातून तुम्हाला ‘सायबर सिक्युरिटी’ कोर्स अगदी मोफत करता येणार आहे. ही यूनिवर्सिटी सायबर सिक्युरिटीमध्ये आता अनेक ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करत असून या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना असे माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीच्या सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी जसे की सायबर हल्ले कसे टाळावे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे इत्यादी बद्दल शिकवले जाणार आहे.

तसेच हा सायबर सिक्युरिटी कार्यक्रम अशा व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला आहे जे नेटवर्क सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक मालमत्तेचे सुरक्षा तसेच सायबर हल्ल्यांपासून त्यांचे संरक्षण आणि ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहेत आणि ज्यांना या क्षेत्रातले त्यांचे ज्ञान वाढवायचे आहे अशांकरिता हा अभ्यासक्रम खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ऑफर केलेला हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र देखील मिळणार असून ते तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्या Resume सोबत जोडू शकता ज्यामुळे तुमच्या अर्जाला वेटेज प्राप्त होईल; हे निश्चित.

अभ्यासक्रममाचा कालावधी (Free Education)
या विद्यापीठाकडून सायबर सिक्युरिटीवर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत व यामध्ये दोन तासापासून ते आठ ते दहा तासांपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये तुम्ही तुमची वेळ आणि गरज यानुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. या अभ्यासक्रमात विषय आणि प्रवेश याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या https://online.stanford.edu/ या वेबसाईटवर मिळेल.

सायबर सुरक्षा तज्ञांना इतका मिळतो पगार
सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून लाखो रुपयांचे पगार किंवा पॅकेज मिळते. जर आपण भारताचाच विचार केला तर चार ते नऊ वर्षाचा अनुभव असलेल्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा सरासरी पगार वर्षाला 12 लाख रुपये इतका असतो. म्हणजेच महिन्याला एक लाख रुपये पगार या व्यक्तींचा असतो. या क्षेत्रात जर तुम्हाला दहा ते वीस वर्षांचा कामाचा अनुभव असेल तर अशा सायबर सुरक्षा तज्ञांचा वार्षिक पगार हा 22 ते 23 लाख रुपये इतका असतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com