Employment News : कंपन्या देतायत दुप्पट पगार…पण कर्मचारीच मिळेनात; तुमच्यासाठी ‘या’ क्षेत्रात आहे लाख मोलाची संधी

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सध्या (Employment News) चर्चेचा विषय आहे. या तंत्रज्ञानामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी AI टूल्स विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक करत आहे. परिणामी जगभरात AI मधील तज्ञ इंजिनियर्सची मागणी वाढली आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज म्हणजेच NASSCOM म्हणते की भारतात 51% AI अभियंते गरजेपेक्षा कमी आहेत. देशात सध्या 4.16 लाख AI अभियंते आहेत. अजून 2.13 लाख अतिरिक्त AI अभियंत्यांची गरज आहे. भारताला जागतिक तंत्रज्ञान उद्योगाचे बॅक ऑफिस म्हटले जाते. पण भारताला ही मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरुन काढता आली नाही.

नॅसकॉमच्या मते, जगातील एआय टॅलेंटमध्ये 16 टक्के वाटा असलेल्या, अमेरिका आणि चीनसह भारत हा जगातील तीन टॉप टॅलेंट मार्केटपैकी एक आहे. अत्यंत कुशल AI, मशीन (Employment News) लर्निंग आणि बिग डेटा टॅलेंटचा जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा भारताचा आहे.
AI इंजिन बनवण्यात या कंपन्या आघाडीवर (Employment News)
Google, Baidu आणि Microsoft सह जवळजवळ प्रत्येक टेक कंपनी AI इंजिन बनवण्यात गुंतलेली आहे. याचा परिणाम म्हणजे सिलिकॉन व्हॅलीपासून बंगळुरूपर्यंत AI इंजिनिअर्सची मागणी गगनाला भिडली आहे.
गेल्या काही महिन्यांत, काही टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना काढून टाकले असले तरी AI मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवर याचा परिणाम झालेला नाही.

इंजिनिअर्ससाठी कंपन्यांची रस्सीखेच
वस्तुस्थिती अशी आहे की AI तज्ञांना भरपूर पगार मिळत आहे. ते 30 ते 50 टक्के पगारवाढीसह नोकऱ्या बदलत आहेत. AI इंजिनियर्सना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या त्यांना (Employment News) चांगला पगार देण्यास तयार आहेत. यामुळेच AI इंजिनिअर्स दुप्पट पगारासाठी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात आहेत.
आरोग्यसेवा, वित्त आणि मनोरंजन कंपन्यांमध्येही AI इंजिनिअर्सची मागणी वाढू लागली आहे. परंतु सध्या असे कर्मचारी  मिळत नाहीत. गेल्या वर्षी भारतात 66 नवीन टेक इनोव्हेशन केंद्रे उघडली गेली आहेत. त्यांना ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (CGC) किंवा कॅप्टिव्ह म्हणतात. आता त्यांची भारतातील एकूण संख्या 1600 च्या जवळपास झाली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com