Education : तृतीयपंथीयांना विद्यापीठांमध्ये मिळणार मोफत शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या (Education) तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करुन देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

तृतीयपंथीयांचा ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा (Education)
मंत्री पाटील यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक राज्यस्तरीय बैठक घेतली होती. यावेळी सार्वजनिक आणि संलग्न विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. अशा विद्यार्थ्यांच्या ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रस्तावाला उपस्थित सर्व कुलगुरूंनी सहमती दर्शवली.

तृतीयपंथीयांचा शिक्षणात समावेश सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. मंत्री (Education) चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना यावेळी आवाहन केलं, की तृतीयपंथी विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने ओळखून त्यादृष्टीने विद्यापीठाने काम करावं. यामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, स्वतंत्र शौचालय नसणे, इतर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव, गुंडगिरी सारख्या घटना – ज्यामुळे अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवतात अशा सर्व आव्हानांचा समावेश असू शकतो. या समस्यांकडे विद्यापीठाने गांभिर्याने लक्ष द्यावे; अशी सूचनाही त्यांनी केली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com