“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे

शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील डॅशिंग आॅफिसर पाहून अधिकारशाही बद्दल आपसुकच वर्दी किंवा शासकीय रुबाबाचे आकर्षण सुरु व्हायचे. पण तेव्हा कोणती परिक्षा दिल्यावर कोणता अधिकारी होता येते याची माहिती नव्हती. या लेखात आपण हेच समजून घेणार आहोत.

प्रशासन, पोलिस, राजस्व, टपाल, वित्त, आरोग्य,वीमा अशा विविध सरकारी खात्यांमध्ये किमान बारावी किंवा पदवीच्या पात्रतेवर वर्ग 3 , वर्ग 2 आणि वर्ग 1 चे अधिकारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात. सर्वप्रथम आपण विविध आयोग आणि त्याद्वारे मिळणारी पदे (सेवा) पाहुया.

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) –

A. 12 वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी साठी प्रवेश परिक्षा,

B. पदवी नंतर

१) अखिल भारतीय सेवा (IAS, IFS (forest), IPS) साठी परिक्षा घेतली जाते, तसेच या परिक्षेतुन परदेश सेवा, राजस्व, रेल्वे, टपाल, ऑडिट अकांऊट, माहीती, काॅर्पोरेट अॅड लाॅ, नागरी वित्त इत्यादी विविध पदांसाठी (सेवा) परिक्षा घेतली जाते. भारतीय वन सेवा आणि यु.पी.एस.सी.ची पुर्व परिक्षा एकत्रच होते. पुर्व, मुख्य (विस्तृत लिखाण) आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परिक्षा वर्ग 1 चं पद मिळवुन देते,
२) Assistant commandant – परिक्षा आणि शारीरिक चाचणी यांच्या आधारावर CAPF, CISF, ITBP, SSB इत्यादी निमलष्करी दलांसाठी वर्ग 1 ची वर्दी मिळवुन देणारी परिक्षा‌ आहे तसेच Combine Defence service ही परिक्षा ही सैन्य,नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी होण्यासाठी घेतली जाते.
‍३) विविध अभियांत्रिकी सेवांसाठी परिक्षा
४) वैद्यकीय सेवांसाठी परिक्षा इत्यादी.
यु.पी.एस.सी‌. मधुन निवडलेल्या अधिकार्यांची नेमणुक भारतात कोठेही संबधित राज्यशासनाच्या अखत्यारीत होते.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) –

A. पदवी नंतर

वर्ग 1 पदांसाठी MPSC कडुन UPSC च्या‌ धर्तीवर तीन टप्प्यांत म्हणजे पुर्व , मुख्य (वस्तुनिष्ठ) आणि मुलाखतीद्वारे उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधिक्षक, कक्ष अधिकारी, तहसीलदार,महाराष्ट्र वित्त सेवा, परिवहन अधिकारी, निबंधक,नायाब तहसीलदार, कौशल्य विकास अधिकारी इत्यादी पदांवर स्पर्धापरिक्षांद्वारा निवडले जातात,महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नेमणूक केली जाते.

वर्ग 2 (अराजपत्रित) साठी पोलिस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय), राज्य(विक्री)कर निरीक्षक इत्यादी तीन पदांसाठी पुर्व आणि मुख्य दोन टप्प्यांत संयुक्त परिक्षा घेतली जाते (PSI साठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे) वर्ग 3‌ साठी कर सहायक, मंत्रालय क्लर्क यांची संयुक्त परिक्षा,
महीला बाल कल्याण,‌उत्पादन शुल्क, अभियांत्रिकी सेवा किंवा इतर राज्य शासन विभागांसाठी मागणीनुसार ‌पदे भरली जातात

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) द्वारे बारावी नंतर क्लर्कीकल पदांसाठी आणि पदवीच्या पात्रतेवर केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग 2 चे अधिकारी तसेच कर्मचारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात, नेमणूक ‌संपुर्ण भारतात कोठेही होते, कार्यालयीन कामकाजासाठीचे सर्व कर्मचारी हा आयोग निवडते , परिक्षा पुर्व आणि मुख्य (गणित आणि इंग्रजी) अशा दोन टप्प्यांत घेतली जाते.

BANK(IBPS) भारतातील प्रत्येक बॅंक “प्रोबेशनरी अधिकारी” आणि “क्लर्क” या दोन सेवांसाठी जागांच्या मागणी नुसार परिक्षेची जाहीरात देते ही परिक्षा IBPS हा आयोग आयोजित करते . या परिक्षेत गणित , बुध्दिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस, फायनान्स आणि इंग्रजी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात.
RBI – बॅकांची बॅंक असलेली RBI, Grade B अधिकारी आणि असिस्टंट या पदांसाठी पुर्व‌ आणि मुख्य (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेते‌.

विविध शासकीय, निमशासकीय वीमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रिय कंपन्या विविध ‌पदवी आणि अनुभव या निकषांवर वेळोवळी पदे भरत असतात त्याततही अनेक संधी आहेत.

तलाठी, ग्रामसेवक या परिक्षा(वस्तुनिष्ठ) संबंधित जिल्हा आयुक्तालय कडुन जागांच्या आवश्यकतेनुसार घेतल्या जातात. तसेच बारावी च्या आधारावर संबंधित पोलिस शहाराकडुन पोलिस/शिपाई सेवेसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेतली जाते.

वरील सर्व आयोगांच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि परिक्षापद्धती इत्यादी संबधी विस्तृत मध्ये माहीती काढुन योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला

1. जमणारी

2. आवडणारी आणि

3. समजणारी परिक्षा मेहनत घेऊन द्यावी.

सर्वांकडे समान शाररीक आणि मानसिक क्षमता असते ,” ज्याचा संघर्ष मोठा त्याचे पद मोठे” ही एकच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
पदवी पर्यंत तुम्हाला किती मार्क मिळाले? , तुम्ही कोठुन आलात ?, तुमच्या घरातले शासकीय सेवेत आहेत का ? तुम्ही अस्सलिखित इंग्रजी बोलता का ? इत्यादी गोष्टी तुमचा वर्ग 3 ते वर्ग 1 पदाचा प्रवास ठरवु शकत नाही, मात्र परिक्षा देण्याचे ठरविल्यानंतर तुम्ही किती जीव ओतुन तयारी करताय ती मेहनत तुम्ही पोलिस शिपाई बनणार की IPS बनणार हे नक्की ठरवते.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)