Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कृती आराखडा तयार केला जात असून लवकरच पुण्यात पहिले केंद्र सुरू करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

समाजकल्याण विभाग आणि बार्टीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी खासगी संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, यामधून शासकीय अनुदान लाटण्यासाठी (Civil Services Guidance) गैरप्रकार होत असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकालदेखील कमी प्रमाणात येत होते. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये परीक्षा केंद्र संचालित केले जाईल. बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली. बार्टीमार्फत अनुदान तत्त्वावर खासगी संस्थेकडून स्पर्धा परीक्षा केंद्रे चालविली जायची.

भरीव शासकीय अनुदान असतानादेखील या संस्था गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात अपयशी ठरल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्रांचा उत्तम दर्जा राखला जावा, यासाठी (Civil Services Guidance) स्वतंत्र परीक्षा केंद्रे सुरू केली जातील, असे भांगे यांनी सांगितले. बार्टीच्या बैठकीला समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश इंगळे आदी उपस्थित होते.
दिल्लीतील प्रशिक्षण संस्थांशी होणार करार
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी विभागाच्यावतीने दिल्लीतील नामवंत प्रशिक्षण संस्थांशी करार करण्यात येणार आहे. याशिवाय, जगभरातील (Civil Services Guidance) विषयतज्ज्ञ, परदेशातील विद्यापीठे यांच्याशीदेखील करार केला जाईल. ऑनलाइन पद्धतीने परदेशातील व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com