CIPET Recruitment 2023 : डिप्लोमा/ग्रॅज्युएट्ससाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी नोकरी; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स (CIPET Recruitment 2023) इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.

संस्था – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर
भरली जाणारी पदे –
1. व्याख्याता
2. सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार
3. प्रशिक्षक (CIPET Recruitment 2023)
4. सल्लागार प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (CIPET Recruitment 2023)
1. व्याख्याता –
प्रथम श्रेणी किंवा समतुल्य पदवी / पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
2. सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार – संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवीधर. किंवा M.B.A. (HRM/PM) संबंधित क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
3. प्रशिक्षक – पूर्णवेळ डिप्लोमा (मेक/प्रॉड/इंडस्ट्रियल/केमिकल/ईईई) /डीपीटी/डीपीएमटी/पीजीडी-पीपीटी किंवा पूर्ण वेळ B.Sc. पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
4. सल्लागार प्रशिक्षणार्थी – पूर्णवेळ प्रथम श्रेणी B.E./B.Tech, किमान 1 वर्षाच्या अनुभवासह योग्य किंवा संबंधित विषयात किंवा योग्य शाखेतील प्रथम श्रेणी पूर्णवेळ डिप्लोमा /DPT/DPMT/ PGD- PPT, किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (CIPET Recruitment 2023)

मिळणारे वेतन – रुपये 30,000/- ते 35,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (CIPET Recruitment 2023)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –
सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, पिन – 431 006
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.cipet.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com