CET Exam 2024-25 : BCA, BBA, BMS, BBM प्रवेशासाठी आता CET देणं बंधनकारक…

करिअरनामा ऑनलाईन । बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या (CET Exam 2024-25) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी (CET) परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून याच्या अंबलबजावणीस सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 एप्रिल 2024 पर्यंत देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून बीसीए(BCA), बीबीए (BBA),बीएमएस (BMS), बीबीएम (BBM) हे अभ्यासक्रम एआयसीटीईने (AICTE) आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी (CET) लागू करण्यात आली आहे.

सीईटी देणे बंधनकारक (CET Exam 2024-25)
शैक्षणिक वर्षे 2024-2025 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार आता या शैक्षणिक वर्षापासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे.

असा करा अर्ज
1. विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्यावी.
2. नंतर होम पेजवर दिलेला बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम CET टॅब निवडा.
3. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पुर्ण करावी लागेल.
4. महत्त्वाची ओळखपत्रे भरून (CET Exam 2024-25) फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा.
5. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.

उमेदवार, पालक, संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा (CET Exam 2024-25) अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाईट www.mahacet.org वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी 2024 या सामाईक प्रवेश परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर ही माहिती उमेदवार व पालकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com