CBSE Exam 2023: CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! 10 वी, 12 वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डानं 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. (CBSE Exam 2023) कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच चालू शैक्षणिक वर्षात CBSE ने बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. मात्र आता CBSE बोर्डानं 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घेऊया…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.

10 वीच्या परीक्षेत ‘हे’ बदल –

  • ज्यामध्ये आता दहावीतील 40 टक्के प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थींना त्यांच्या आकलनाच्या आधारे द्यावी लागणार आहेत.
  • यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा रटाळ न वाटता केलेला अभ्यास समजुन घेऊन उत्तर देता येईल.
  • यामध्ये विद्यार्थ्यांना कार्यक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
  • याशिवाय 20 टक्के प्रश्न MCQ आणि 40 टक्के प्रश्न लहान उत्तरांचे असतील.

12 वीच्या परीक्षेतील बदल – (CBSE Exam 2023)

  • परीक्षेतील 50% प्रश्न हे लघु आणि दीर्घ उत्तराचे असतील.
  • त्याचवेळी, 30 टक्के प्रश्न केस स्टडीचे असतील आणि 20 टक्के प्रश्न बहुपर्यायी म्हणजेच MCQ प्रकारचे असतील.
  • नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मंडळाने हे बदल केले आहेत.
  • ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता पेपर लिहणं रटाळ न वाटता समजुतीवर प्रश्न सोडवता आले पाहिजे, असे मंडळाचे मत आहे.

CBSE बोर्ड लवकरच सॅम्पल पेपर्स उपलब्ध करणार आहे. हे सॅम्पल पेपर्स सुधारित परीक्षा पद्धतीवर आधारित असतील. बोर्डाने यापूर्वीच अभ्यासक्रम जाहीर केला आहे. हा अभ्यासक्रम दोन सत्रात विभागलेला नाही. मात्र वार्षिक परीक्षेवरील अधिकृत परिपत्रक आता आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com