Career Tips : मोठी कमाई करण्यासाठी 12 वी नंतर करा ‘हे’ कोर्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी (Career Tips) आता पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. आज आम्ही या विद्यार्थ्यांना अशाच काही डिप्लोमा/पदविका अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. चला या पर्यायांवर एक नजर टाकूया जे कोर्स 12 वी नंतर करता येतील.

ज्वेलरी आणि इंटिरियर डिझायनिंग (Career Tips)
तुम्हाला इंटिरिअर डिझायनिंगमध्ये रस असेल किंवा तुम्हाला ज्वेलरी डिझाइन आवडत असेल तर 12 वी नंतर तुम्ही या क्षेत्रातही बरंच काही शिकू शकता. काळ बदलत आहे त्याप्रमाणे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच त्यांच्या घराच्या आतील भागाची सजावट करण्यासाठी खूप जागरूक असतात. त्यामुळे या क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासोबतच ज्वेलरी डिझायनिंग हाही एक क्रियारसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

होटल मॅनेजमेंट (Career Tips)
जर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आकर्षण वाटत असेल आणि या क्षेत्रात करिअर करण्याचा कधी विचार केला असेल, तर तुम्ही बारावीनंतरही या क्षेत्रात प्रगती करू शकता. यासाठी बारावीनंतर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र प्रवेश निकष आहेत, त्यामुळे संबंधित संस्थेचा तपशील मिळवून, आपण त्याच्याशी संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकता.

इव्हेंट मॅनेजमेंट
बदलत्या काळानुसार प्रत्येकाला आपले छोटे-मोठे कार्यक्रम संस्मरणीय बनवायचे असतात. यासाठी ते व्यावसायिकांची मदत घेतात. त्यामुळे हा उद्योग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे (Career Tips) तुम्हाला हवे असल्यास या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रम करून चांगल्या प्रोफाइलवर नोकरी मिळू शकते आणि तुम्ही वैयक्तिक स्वतःचा व्यवसाय करुन चांगली कमाई करु शकता.

हे पर्याय आहेत उपलब्ध (Career Tips)
1. डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट
2. डिप्लोमा इन ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट
3. हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा
4. मार्केटिंग आणि जाहिरात डिप्लोमा
5. ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com