करिअरनामा ऑनलाईन । शेना अग्रवाल या मुळच्या (Career Success Story) हरियाणातील यमुनानगरच्या रहिवासी आहेत. 2011 मध्ये झालेल्या UPSC (UPSC) परीक्षेत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे स्थान मिळवण्यात यश आले आहे. शेना लहानपणापासूनच अभ्यासात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जायच्या. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेतही त्या अव्वल ठरल्या. शेना यांनी 12वीत 92% आणि 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळवले होते. 2004 मध्ये झालेल्या CBSE प्री मेडिकल टेस्ट (PMT) मध्ये त्या टॉपर ठरल्या होत्या. शाळेत सर्व स्तरावर आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या एम्समधून (AIIMS Delhi) MBBS पूर्ण केले. शेना यांनी UPSC परीक्षेत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. जाणून घेवूया त्यांच्या प्रवासाविषयी….
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही (Career Success Story) जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. जे मेहनत घेतात तेच या परीक्षेत पास होतात आणि IAS, IFS, IPS आणि IRS अधिकारी होतात. या परीक्षेला जे बसतात त्यांना जीवतोड कष्ट घ्यावे लागतात. शेना या विद्यार्थ्यांपैकी आहे ज्यांनी मेडिकल सारखी कठीण परीक्षा पास करून UPSC मध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्टमध्ये अव्वल येण्याबरोबरच शेना अग्रवाल (IAS Shena Aggarwal) यूपीएससीमध्येही टॉपर ठरल्या आहेत.
आई-वडील आहेत डेंटिस्ट
शेना यांचे वडील सी. के. अग्रवाल आणि त्यांची आई पिंकी अग्रवाल (Career Success Story) पेशाने डेंटिस्ट आहेत. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुलीनेसुध्दा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 2009 मध्ये एम्स, नवी दिल्ली येथून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
पहिल्या 2 प्रयत्नात करावा लागला अपयशाचा सामना
UPSC परीक्षेच्या सुरवातीच्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले. यानंतर मात्र आयएएसच्या तिसऱ्या प्रयत्नाची त्यांनी जोरदार तयारी केली. शेना नागपुर येथे आयआरएसचे (IRS) प्रशिक्षण घेत होत्या. यादरम्यान त्यांचा अभ्यास सुरूच होता. UPSCमध्ये चांगली रॅंक मिळवण्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. शेवटी त्यांना मेहनतीचं फळ मिळालं. त्यांनी 2010 मध्ये UPSC परीक्षेत AIR 305 मिळवली. पण एवढयावर त्या समाधानी नव्हत्या. समोर सर्व आव्हाने असूनही, शेना यांनी पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला आणि जोमाने अभ्यास सुरू केला आणि 2011 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून AIR 1 मिळवली. तुम्ही जे काही कराल ते तुम्ही पूर्ण क्षमतेने केले तर तुम्ही हवं ते मिळवू शकता; हे शेना यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
सीबीएसई बोर्ड ते मेडिकल प्रवेश परीक्षांमध्येही केलं टॉप
शेना अग्रवाल यांनी 2011 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे स्थान मिळवण्यात यश आले आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या शेना या सर्व परीक्षेत अव्वल येण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 92% आणि 10 वीच्या परीक्षेत 95% गुण मिळाले होते. 2004 मध्ये झालेल्या CBSE प्री मेडिकल टेस्ट (PMT) मध्येही त्या टॉपर ठरल्या. यानंतर त्यांनी दिल्लीच्या एम्समधून एमबीबीएस पूर्ण केले. सर्व परीक्षेत टॉप करणाऱ्या शेना तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरल्या आहेत.
पती-पत्नी दोघे आहेत उच्च अधिकारी
UPSC परीक्षेत टॉप केल्यानंतर IAS झालेल्या शेना अग्रवाल सध्या सामाजिक सुरक्षा आणि महिला व बाल विकास विभागाच्या विशेष सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे (Career Success Story) पती सन्यम अग्रवाल यांची कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांनी 2015 मध्ये लुधियाना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि 2019 मध्ये जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त (ADC) म्हणून काम केले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com