Career Success Story : इन्फोसिसमध्ये पाहुण्यांना द्यायचा चहा-पाणी; दोन भाषा शिकला अन् थेट झाला CEO

करिअरनामा ऑनलाईन । हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर (Career Success Story) हा तरुण करिअर घडवण्यासाठी आपल्या गावातून पुण्यात आला. तो महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी आहे. कधीकाळी पुणे शहरात इन्फोसिस कंपनीत असलेला ऑफिस बॉय आज दोन कंपन्यांचा सीईओ झाला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे खरं आहे. आज आपण दादासाहेब भगत या तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत. ही कहाणी नक्कीच तुम्हाला प्रेरणा आणि नव्या कल्पना देईल.

रुम सर्व्हिस बॉय म्हणून केलं काम
दादासाहेब यांनी आयटीआय डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर ते रुम सर्व्हिस बॉय म्हणून दरमहा 9,000 रुपये पगारावर काम करत होते. पण नंतर त्यांनी औद्योगिक नोकरी निवडण्याऐवजी इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये नोकरी पत्करली. इन्फोसिस गेस्ट हाऊसमध्ये ते येणाऱ्या पाहुण्यांना रूम सर्व्हिस, चहा-पाणी देण्याचे काम करत होते.
IT क्षेत्रात रस वाटू लागला 
इन्फोसिसमध्ये काम करत असताना त्यांना IT क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि इथेच त्यांना सॉफ्टवेअरचे महत्त्व कळले. कॉर्पोरेट जगात येण्यासाठी ते उत्साही होते पण त्यांना माहित होते की महाविद्यालयीन पदवी घेतल्याशिवाय त्यांना येथे संधी मिळणार नाही. या गोष्टीवर विचार सुरु असताना (Career Success Story) त्यांना अॅनिमेशन आणि डिझाइन शिकण्यामध्ये आवड निर्माण झाली. ते दिवसा काम करायचे आणि संध्याकाळी अॅनिमेशन क्लासला जायचे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, त्यांना मुंबईत चांगली नोकरी मिळाली; पण हैदराबादला जाण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली.

डिझाइन टेम्पलेट्स ऑनलाइन विकले
हैदराबाद येथील डिझाईन आणि ग्राफिक्स फर्ममध्ये काम करत असताना दादासाहेब यांनी पायथन (Python) आणि सी++ (C++) लँग्वेज शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले की भिन्न दृश्य प्रभाव तयार करणे खूप वेळ घेणारे आहे आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या टेम्पलेट्सची लायब्ररी तयार करणे खूप चांगले होईल. त्यांची कल्पना जसजशी विकसित झाली, तसतसे त्यांनी हे डिझाइन टेम्पलेट्स ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली.

अपघातानंतर दोन स्टार्टअप सुरु केले
एकदिवस भगत यांचा कर अपघात झाला. त्यामध्ये ते इतके जखमी झाले; की त्यांना अंथरुणावर खिळून रहावे लागले. नाईलाजाने त्यांना नोकरी सोडावी लागली. अंथरुणावर असताना ते शांत राहिले नाहीत. त्यांनी हा सर्व वेळ डिझाईन लायब्ररी तयार करण्यास दिला. त्याचवर्षी त्यांची पहिली कंपनी NinthMotion ची स्थापना झाली. अल्पावधीत त्यांनी बीबीसी (BBC) स्टुडिओ आणि 9XM (9XM) म्युझिक चॅनल यांसारख्या प्रसिद्ध संस्थांसह जगभरातील अंदाजे 6,000 ग्राहकांना सेवा दिली.
भगत यांनी ऑनलाइन ग्राफिक डिझाइनसाठी कॅनव्हाशी तुलना करता येईल अशी वेबसाइट विकसित करण्याचा निर्णय घेतला. भगत यांची दुसरी कंपनी ड्युग्राफिक्स ही (Career Success Story) त्याचीच एक फळी होती. वापरकर्ते प्लॅटफॉर्मच्या सोप्या ड्रॅग-अँड-ड्रॉप इंटरफेसचा वापर करून टेम्पलेट आणि डिझाइन तयार करू शकतात.

गावातच उभारली दुसरी कंपनी (Career Success Story)
दादासाहेब यांचे ऑनलाइन ग्राफिक्समध्ये काम सुरु होते. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन आले. मग दादासाहेब यांना  आपल्या गावी जावे लागले. गावात चांगल्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने त्यांना तात्पुरती व्यवस्था उभारावी  लागली. गावातील काही तरुणांना प्रशिक्षण देऊन तिथेच कार्यालय सुरू केले. २०२० मध्ये DooGraphics ही कंपनी सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांच्या कामाचे कौतूक केले. आज दादासाहेब यांच्या कंपन्यांचे ग्राहक महाराष्ट्रासह दिल्ली, बंगळुरू येथे आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमधून त्यांना ऑर्डरी येतात. त्यांना DooGraphics ला जगातील सर्वात मोठ्या डिझाइन पोर्टलमध्ये बदलायचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com