Career Success story : गावातील शाळकरी मुलगी 15 व्या वर्षी बनली ब्रॅन्ड ऍम्बेसिडर! पहा कशी केली ऐश्वर्याने ही किमया

करिअरनामा ऑनलाईन। अतिशय जिद्दी, मेहनती आणि अभ्यासात हुशार असणाऱ्या (Career Success story) ऐश्वर्याला एका ‘रहस्य ऑईल ऑर्गेनिक’ गोडेतेल कंपनीची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून झळकण्याची संधी मिळाली आहे. कंपनीची जाहिरात करणारे तिचे पोस्टर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी झळकलेसुद्धा.

यश मिळवायचं असेल तर जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा या गोष्टींना पर्याय देऊन चालत नाही. त्यासाठी या तिन्ही गोष्टी सातत्य ठेवून कराव्या लागतात. तसं केलं तरच यश मिळतं, हे नववीत शिकणाऱ्या ऐश्वर्याने सिध्द करुन दाखवलं आहे. इंदापुरातील एका गावातील मुलीला एका प्रतिष्ठीत तेल कंपनीची ब्रॅन्ड ऍम्बेसिडर म्हणून झळकण्याची संधी मिळाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या मुलीचं नाव आहे, ऐश्वर्या काटकर.

मुलांमधील कलांना वाव मिळणं गरजेचं

इंदापूरच्या वडापुरी या गावातील ऐश्वर्या इयत्ता नववीत शिकते. अभ्यासातही हुशार असणाऱ्या ऐश्वर्याला एका गोडतेल कंपनीच्या ब्रॅन्ड ऍम्बेसिडर म्हणून झळकण्याची संधी मिळालीय. या निमित्ताने मुलामुलींमध्ये कला गुण असतात. पण त्यांना संधी मिळण्याची गरज असते, हे देखील पुन्हा अधोरेखित झालंय.

शेतकरी कुटुंबात जन्म (Career Success story)

वडापुरी गावातील रहिवासी असणाऱ्या ऐश्वर्याचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. ऐश्वर्या तशी अतिशय जिद्दी, मेहनती आणि अभ्यासात हुशार म्हणून ओळखली जाते. ती सध्या ठिकठिकाणी पोस्टरवर झळकत आहे. एक मॉडेल म्हणून मिळालेली ही संधी तिच्या करीअरला निश्चितच कलाटणी देणारी ठरेल, असा विश्वास तिच्यासह तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

ग्रामीण भागातील मुला – मुलींसाठी ठरली आयडॉल

यानिमित्ताने ग्रामीण भागातील मुला- मुलींमध्येही कला गुण असतात, फक्त त्यांना संधी मिळणे गरजेचे असते हे सिद्ध झालं आहे. मूळचे वडापुरीचे असलेल्या सतीश काटकर व सीमा काटकर या दाम्पत्याची ऐश्वर्या ही कन्या. ती सध्या बावडा येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववी शिकत आहे. वडील सतीश काटकर यांचा अकलूज येथे लाकडी घाना तेलविक्रीचा व्यवसाय आहे. ऐश्वर्या ही मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आई वडिलांना व्यवसायामध्ये हातभार लावते. ऐश्वर्याची रहस्य तेल कंपनीने ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून निवड केल्याने सध्या ती ग्रामीण भागातील मुला – मुलींसाठी आयडॉल ठरली आहे.

अशी झाली निवड

ऐश्वऱ्याचे उद्योग, व्यवसायातील गुण, मार्केटिंगची कला, बोलण्याचे चातुर्य हे गुण कंपनीने हेरले. तिच्यातील या कौशल्यामुळे रहस्य ऑईल ऑर्गेनिक कंपनीच्या अजीवन ब्रँड विद्यार्थी म्हणून तिची निवड (Career Success story) करण्यात आली आहे. तिचे हे यश विद्यार्थी वर्गासाठी प्रेरणा देणारे आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com