करिअरनामा ऑनलाईन । सायन्स शाखेतून PCB घेऊन 12 वी (Career in Radiology) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रेडिओलॉजी क्षेत्रात करिअर करू शकतात. रेडिओलॉजी हे मेडिकल क्षेत्रातील एक महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये रेडिओलॉजी अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी NEET ची आवश्यकता नसते. त्यामुळे NEET मध्ये चांगला स्कोर न करू शकलेले विद्यार्थी सुध्दा रेडिओलॉजीमध्ये करिअर करु शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत रेडिओलॉजी अभ्यासक्रमाविषयी तसेच हा अभ्यासक्रम शिकवणारी आघाडीची महाविदलये कोणती आहेत आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही किती पैसे कमावू शकता याविषयी….
रेडिओलॉजिस्टचे काम काय असते?
रेडिओलॉजिस्ट हे रुग्णाच्या शरीरातील आजार शोधून काढण्यासाठी एक्स-रे, सिटीस्कॅन, पीईटी स्कॅन, अल्ट्रासाउंड एमआरआय स्कॅन इत्यादी तंत्रांचा वापर करून रुग्णाचा रेडिओग्राफी अहवाल तयार करतात. यामुळे रुग्णाच्या संबंधित आजाराचे अचूक निदान करता येते.
हे अभ्यासक्रम शिकून रेडिओलॉजी क्षेत्रात करता येईल करिअर –
1. डिप्लोमा अभ्यासक्रम (Diploma courses) –
1. Diploma in Medical lab technologies (कालावधी 2 ते 2.5 वर्षे)
2. Diploma in radiography (कालावधी 2 वर्षे)
3. Diploma in x-ray technician (कालावधी 2 वर्षे)
2. पदवी अभ्यासक्रम (Degree courses) –
1. Bsc in Radiology, Radio Therapy (कालावधी 3 वर्षे)
2. BSc in Medical (Radio) Imaging Technology (कालावधी 3 वर्षे + 1 वर्ष इंटर्नशिप)
3. BSc Medical Laboratory Technology (कालावधी 3 वर्षे + 6 महिने इंटर्नशिप)
3. सर्टिफिकेट कोर्सेस –
1. Certificate in Radiography (Career in Radiology)
2. Certificate in Radiology Assistant
3. Certificate in Diagnostic Radiography
असा मिळतो प्रवेश –
पदवीनंतर उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास उमेदवार रेडिओलॉजीमध्ये M.sc. आणि त्यानंतर PHD ची निवड करू शकतात. रेडिओलॉजी अभ्यासक्रमात ऍडमिशन मिळवण्यासाठी (Career in Radiology) उमेदवारांची मेरिट लिस्ट काढली जाते किंवा उमेदवाराला संबंधित युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते.
या महाविद्यालयातून शिकू शकता रेडिओलॉजी अभ्यासक्रम –
1. NIMHANS – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेस, बेंगलोर
2. आर्म्ड फॉर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
3. डॉ. डी.वाय.पाटील यूनिवर्सिटी, नवी मुंबई
4. AIIMS – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली
5. PGIMER – पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगड
रेडिओलॉजीनंतर इथे मिळते नोकरीची संधी –
1. रेडिओलॉजी टेक्निशियन
2. सिटीस्कॅन टेक्नॉलॉजिस्ट
3. एमआरआय टेक्नॉलॉजिस्ट
4. रेडिओलॉजी असिस्टंट (Career in Radiology)
5. कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट
6. रेडिओलॉजी नर्स
7. अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजिस्ट
8. न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट
इतके मिळते वेतन – (Career in Radiology)
रेडिओलॉजीमधील एखादा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास 30 ते 80 हजारापर्यंत वेतन मिळू शकते. तर डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास 25 ते 40 हजारांपर्यंतचे वेतन मिळू शकते. उमेदवाराकडे किती अनुभव आहे आणि त्याने कोणती पदवी प्राप्त केली आहे यावर वेतन अवलंबून असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com